किशोरी आमोणकर यांची काही गाजलेली गाणी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2017 10:07 IST2017-04-04T04:37:21+5:302017-04-04T10:07:21+5:30
लोकप्रिय शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांच्या सुमधूर आवाजातील अशीच काही गाणी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. किशोरी आमोणकर यांना यापेक्षा दुसरी कुठलीच मोठी श्रद्धांजली होऊ शकत नाही, असे आमचे मत आहे.

किशोरी आमोणकर यांची काही गाजलेली गाणी...
ल कप्रिय शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचे सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. जयपूर घराणाच्या अध्वर्यू असलेल्या किशोरी आमोणकर यांनी १९४० च्या दशकात आपल्या संगीत साधनेला सुरुवात केली.
जयपूर अत्रौली घराण्याच्या तालेवार गायिका मोगुबाई कुर्डीकर या किशोरीतार्इंच्या मातोश्री. त्यामुळे घरातूनच त्यांना संगीताचे बालकडू मिळाले. आईकडून संगीताचे प्राथमिक धडे घेतल्यानंतर भेंडी बझार घराण्याच्या गायिका अंजनीबाई मालपेकर यांच्याकडे त्यांची संगीत साधना सुरु झाली. ख्याल, ठुमरी, भजन यासोबत चित्रपट संगीतातही त्यांनी वेगळ्या ठसा उमटवला. अनेक हिंदी चित्रपटांत त्या गायल्या. शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग, अत्यंत मोजकी अशी गायलेली भावगीते, चित्रपटगीते आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांच्या सुमधूर आवाजातील अशीच काही गाणी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. किशोरी आमोणकर यांना यापेक्षा दुसरी कुठलीच मोठी श्रद्धांजली होऊ शकत नाही, असे आमचे मत आहे.
त्यांची अनेक गाणी लोकप्रिय आहेत. त्यांनी गायलेलं ‘सहीला रे’, ‘आज सजन संग’ ही गाणी आजही श्रोत्यांच्या कानात रूंजी घालतात.
१९६४ साली किशोरी आमोणकर यांनी प्रथम पार्श्वगायन केले. ‘गीत गाया पत्थरों ने’ या चित्रपटात त्या गायल्या.
शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या किशोरी आमोणकर ख्याल गायकी बरोबरच ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकार प्रभावीपणे सादर करत. त्यांच्या स्वरांत श्रोते न्हाऊन निघत
.अवघा रंग एक झाला, मी माझे मोहित, जनी जाय पाणियासी हे त्यांचे अभंग, तसेच म्हारो प्रणाम ही मीरेची भजने लोकप्रिय होती. किशोरीतार्इंच्या जाण्याने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे मोठे नुकसान झाले आहे. ही पोकळी कधीच भरून निघणे शक्य नाही. पण स्वर संचिताच्या रूपात त्या कायम आपल्या मनात जिवंत राहणार आहेत.