म्हणून सुमेध मुद्गलकरचे चाहते मांजासाठी उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2017 12:11 PM2017-06-19T12:11:22+5:302017-06-19T17:41:22+5:30

आधी 'डान्स महाराष्ट्र डान्स' त्यानंतर 'डान्स इंडिया डान्स सिझन ४', 'दिल दोस्ती डान्स' आणि सम्राट अशोका यासारख्या मालिका आणि ...

So, the fans of Sumedh Mudgalkar are eager to dance | म्हणून सुमेध मुद्गलकरचे चाहते मांजासाठी उत्सुक

म्हणून सुमेध मुद्गलकरचे चाहते मांजासाठी उत्सुक

googlenewsNext
ी 'डान्स महाराष्ट्र डान्स' त्यानंतर 'डान्स इंडिया डान्स सिझन ४', 'दिल दोस्ती डान्स' आणि सम्राट अशोका यासारख्या मालिका आणि रिअॅलिटी शो मधून अभिनेता सुमेध मुद्गलकर हा घराघरात पोहोचला. इतकंच नव्हे तर अगदी कमी वयात सुमेधचा भला मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. उत्तम डान्स करण्यासोबतच त्याच्या उत्तम अभिनय कौशल्याने सुमेधने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. सुमेध आता मांजा या आगामी सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्याच्या या चित्रपटासाठी त्याचे चाहते अत्यंत उत्सुक आहेत आणि हि उत्सुकता ते सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियाद्वारे सुमेधवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रेशमाच्या नात्याला संवादाची धार अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमाबाबत आणि अश्विनी भावे यांच्या भूमिकेविषयी रसिकांमध्ये उत्सुकता आहे. या सिनेमाचा विषय वेगळा आणि आजवर कधीही मांडण्यात आलेला नसल्याचा दावा निर्माता दिग्दर्शकांकडून करण्यात आलाय. अश्विनी भावे यांच्यासोबतच या चित्रपटात ‘बालक पालक’ फेम रोहित फाळके आणि ‘डान्स इंडिया डान्स’ फेम सुमेध मुदगलकरसुद्धा या सिनेमात झळकणार आहेत. सिनेमाची कथा-पटकथा, आणि दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक जतिन वागळे यांनी सांभाळली आहे. ‘इंडिया स्टोरीज’ निर्मित मांजा सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश या हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांनी मराठी सिनेमाची निर्मिती केलीय. विशेष म्हणजे प्रदर्शनापूर्वीच ध्यानीमनी सिनेमाने रसिकांचे लक्ष वेधले होते.प्रेक्षकांसहित बॉलिवुड आणि मराठी कलाकारदेखील या चित्रपटाच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळात आहे. सध्या फक्त आणि फक्क मांजा सिनेमाची चर्चा ऐकायला मिळत असल्यामुळे प्रदर्शनापूर्वीच सिनेमा रसिकांपर्यंत पोहचल्यामुळे रूपेरी पडद्यावर काय कमाल करणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Web Title: So, the fans of Sumedh Mudgalkar are eager to dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.