स्मिता तांबेच्या सावट या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 06:00 PM2019-03-10T18:00:00+5:302019-03-10T18:00:02+5:30

नेहमी कथांमध्ये ‘वाईट शक्ती’म्हटलं की स्त्री रूपचं असतं असं आपण अनादी काळापासून कल्पनेत पाहतो. बाईला देवी म्हणून पूजणारे आपण क्षणात तिला हडळ म्हणून वाळीतही टाकतो, यावरच सावट हा सिनेमा भाष्य करतो.

smita tambe's Savat movie trailer launched | स्मिता तांबेच्या सावट या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

स्मिता तांबेच्या सावट या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनेत्री स्मिता तांबे सांगते, “सावट सिनेमात मी कणखर पोलिस अधिकारी आदिती देशमुखच्या भूमिकेत दिसणार आहे. हुशार, संवेदनशील आणि करारी व्यक्तिमत्वाची आदिती ‘सत्या’चा शोध घेताना येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला कणखरपणे दोन हात देते.

हितेशा देशपांडे, स्मिता तांबे, आणि शोभिता मांगलिक या तीन महिला निर्मात्या 'महिला सशक्तीकरणा'वर भाष्य करणारा सुपरनॅचरल थ्रिलर ‘सावट’ सिनेमा लवकरच घेऊन येतायत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आठवड्याचं औचित्य साधून या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आलाय.

याविषयी सिनेमाचे दिग्दर्शक सौरभ सिन्हा सांगतात, “सावट हा चित्रपट सुपरनॅचरल थ्रिलर आहे. बऱ्याचदा अशा धाटणीच्या चित्रपटात भुताटकी, हडळ, चेटकीणच लोकांना घाबरवते. नेहमी कथांमध्ये ‘वाईट शक्ती’म्हटलं की स्त्री रूपचं असतं असं आपण अनादी काळापासून कल्पनेत पाहतो. बाईला देवी म्हणून पूजणारे आपण क्षणात तिला हडळ म्हणून वाळीतही टाकतो, यावरच हा सिनेमा भाष्य करतो. त्यामुळे स्त्रीशक्तिला समर्पित करणाऱ्या आठवड्यात सिनेमाचा ट्रेलर आम्ही लाँच केला. त्यातच योगायोगाने सिनेमाच्या तिन्ही निर्मात्या स्त्रियाच असल्याने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दुसऱ्या दिवशी हा ट्रेलर लाँच करून स्त्रियांविषयीचा नवा दृष्टिकोण देणाऱ्या नव्या पर्वाची सुरुवात करावी, असं आम्हाला वाटलं.”

सुपरनॅचरल थ्रिलर धाटणीच्या या सिनेमाचा ट्रेलर सिनेमाविषयीची उत्कंठा वाढवणारा आहे. सिनेमाची निर्माती आणि अभिनेत्री स्मिता तांबे सांगते, “सावट सिनेमात मी कणखर पोलिस अधिकारी आदिती देशमुखच्या भूमिकेत दिसणार आहे. हुशार, संवेदनशील आणि करारी व्यक्तिमत्वाची आदिती ‘सत्या’चा शोध घेताना येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला कणखरपणे दोन हात देते. पोलिस आहेत म्हणून आपल्या सहकाऱ्यांना साथ द्यायची आणि गुन्हेगार आहेत म्हणून त्यांच्या बोलण्यावर अविश्वास दाखवायचा, अशी ती वागत नाही. तिच्यावर कोणी आपला प्रभाव टाकून तिची मतं बदलवू शकत नाही. अशापद्धतीने स्वत:ची लढाई खंबीरपणे लढणाऱ्या स्त्रियांविषयी मला जास्त आदर आहे. महिला दिनीच्याच आठवड्यात लाँच झालेला हा ट्रेलर रसिकांना आवडेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

'निरक्ष फिल्म्स'च्या सहयोगाने 'लेटरल वर्क्स प्रा.लि.' आणि 'रिंगीग रेन फिल्म्स’च्या सावट चित्रपटाचे दिग्दर्शन सौरभ सिन्हा यांनी केले आहे. हितेशा देशपांडे, स्मिता तांबे आणि शोभिता मांगलिक यांची निर्मिती असलेल्या 'सावट' चित्रपटात श्वेतांबरी, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव आणि स्मिता तांबे  मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २१ मार्च २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. 

Web Title: smita tambe's Savat movie trailer launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.