स्मिता-सोनाक्षी आमने सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 16:33 IST2016-11-29T16:33:14+5:302016-11-29T16:33:14+5:30

 दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आणि मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबे मोठ्या पडदयावर आमने-सामने आल्या आहेत. स्मिता आणि सोनाक्षी लवकरच आपल्याला ...

Smita-Sonakshi face-to-face | स्मिता-सोनाक्षी आमने सामने

स्मिता-सोनाक्षी आमने सामने

 
बंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आणि मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबे मोठ्या पडदयावर आमने-सामने आल्या आहेत. स्मिता आणि सोनाक्षी लवकरच आपल्याला एका आगामी बॉलिवूड चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. स्मिताने याआधी सिंघम २ या चित्रपटात अजय देवगन सोबत काम केले होते. आता पुन्हा ती बॉलिवूडमध्ये एका नव्या भूमिकेसाठी सज्ज झाल्याचे समजतेय. सोनाक्षी नेहमीच प्रेक्षकांना एकदम डॅशिंग अंदाजात तिच्या प्रत्येक चित्रपटात पहायला मिळते. आता ती आगामी चित्रपटामध्ये काय कमाल करतेय हे पाहणे देखील मनोरंजक ठरणार आहे. स्मिताने मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच विविध भूमिका साकारुन अगदी राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविली आहे. माझ्या चित्रपटांमध्ये मीच हिरो असते असे म्हणणाºया स्मिताने तिच्या प्रत्येक चित्रपटातून हे सिदध करुन दाखविले आहे. तर सोनाक्षीला देखील बॉलिवूडमध्ये हिरोची पदवी सर्वांनी बहाल करुन टाकली आहे. आता या दोन रावडी अभिनेत्री एकाच चित्रपटात आमने सामने आल्यावर नक्कीच काहीतरी कमाल करणार यात काही शंकाच नाही.

Web Title: Smita-Sonakshi face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.