सोळावं वरीस धोक्याचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 12:48 IST2016-04-27T07:18:26+5:302016-04-27T12:48:26+5:30

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील ट्रेलरवरून या चित्रपटात तारुण्यात नुकत्याच पदार्पण ...

Sixteen Warrior threats | सोळावं वरीस धोक्याचं

सोळावं वरीस धोक्याचं

ग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील ट्रेलरवरून या चित्रपटात तारुण्यात नुकत्याच पदार्पण केलेल्या एका जोडप्याची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे असे दिसत आहे. मराठी चित्रपटांमध्ये या वयातील जोडप्याची कथा याआधीही प्रेक्षकांना टाईमपास, फँड्रीसारख्या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर बक्कळ  कमाई केली होती. कोवळ््या वयातील प्रेम हा मराठीत जणू ट्रेंडच बनला आहे अशी सध्या चर्चा सुरू आहे. 

मराठी चित्रपट हे गेल्या काही वर्षांत खूप बदलले आहेत. आजकाल केवळ मराठीच नव्हे तर अमराठी लोकही मराठी चित्रपट पाहाण्यासाठी चित्रपटगृहात जात आहेत. काही वर्षांपूर्वीच्या मराठी चित्रपटांची कथा, मांडणी यांमुळे तरुणवर्ग मराठी चित्रपट पाहायला तितकासा उत्सुक नसायचा. पण सध्या ही परिस्थिती बदलली आहे. तरुण वर्गही आवर्जुन चित्रपटगृहात जाऊन मराठी चित्रपटांचा आनंद लुटतो. याविषयी दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले, पूर्वी मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहाणे हे तरुण वर्गाला पटणारे नव्हत. त्यांना ते कमीपणाचे वाटायचे. पण आता त्यांच्यासाठी मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहाणे एक स्टाईल स्टेटमेंट झाले आहे आणि हे मराठी चित्रपटांसाठी खूप चांगले आहे.

बालक पालक या चित्रपटानंतर मराठी चित्रपट हा तरुणांना, कुमारअवस्थेतील मुलांना केंद्रित करून बनवला जाऊ शकतो याची सगळ््यांना जाणीव झाली. पूर्वी मराठी चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग हा तिशीतील मानला जात असे. पण या चित्रपटांमुळे तरुणही मराठी चित्रपटाकडे वळले आहेत आणि याचा फायदाच मराठी चित्रपटसृष्टीला होत आहे. तरुणवर्गामुळे मराठी चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. कारण त्यांना चित्रपट आवडल्यावर ते सोशल मीडियाच्या मार्फत चित्रपटाचा प्रसार करतात याचा चित्रपटांना फायदाच होतो.

सैराट या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यामते पूर्वी कुमारअवस्थेतील प्रेमाची तितकीशी चर्चा समाजात, चित्रपटातही होत नसे. टाईमपास, फँड्री यांसारख्या चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षक हे विषय स्वीकारत असल्याचं आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे या पठडीतील अनेक चित्रपट येत आहेत.

अभिनेता किशोर कदम याविषयी आपलं मत मांडताना म्हणाले, आजकाल अनेक चित्रपट हे तरुणांना नजरेसमोर ठेवून बनवले जात आहेत. यामुळे अधिकाधिक तरुण मराठी चित्रपटाकडे आकर्षिले जात आहेत. याचा मराठी चित्रपटसृष्टीला नक्कीच फायदा होईल. आणि यातही या चित्रपटांमध्ये केवळ प्रेमकथा नसून प्रेमकथेच्या अनुषंगाने वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. नागराजचा सैराट ही प्रेमकथा असली त्यात काहीतरी वेगळेपण असणारच याचा मला विश्वास आहे. 
यावरून भविष्यातही मराठीत असे अनेक चित्रपट पाहायला मिळतील अशी आशा धरायला हरकत नाही. 

Web Title: Sixteen Warrior threats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.