"सर, तुम्ही दिग्गज आहात पण मी...", प्रसाद ओकच्या रिलस्टारवरील वक्तव्यावर सिद्धांत सरफरेची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 11:17 IST2025-08-27T11:16:46+5:302025-08-27T11:17:26+5:30

मराठी सिनेइंडस्ट्रीतला प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक(Prasad Oak)ने महाराष्ट्राची हास्यजत्रा शोममध्ये रिलस्टारवर विधान केले होते, जे चर्चेत आले आहे. अनेकांनी प्रसादच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. दरम्यान प्रसाद ओकच्या वक्तव्यावर सिद्धांत सरफरे(Siddhant Sarfare)ने प्रतिक्रिया दिली आहे.

''Sir, you are a legend but I...'', Siddhant Sarfare's reaction on Prasad Oak's statement on Reelstar | "सर, तुम्ही दिग्गज आहात पण मी...", प्रसाद ओकच्या रिलस्टारवरील वक्तव्यावर सिद्धांत सरफरेची पोस्ट चर्चेत

"सर, तुम्ही दिग्गज आहात पण मी...", प्रसाद ओकच्या रिलस्टारवरील वक्तव्यावर सिद्धांत सरफरेची पोस्ट चर्चेत

मराठी सिनेइंडस्ट्रीतला प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक(Prasad Oak)ने महाराष्ट्राची हास्यजत्रा शोममध्ये रिलस्टारवर विधान केले होते, जे चर्चेत आले आहे. अनेकांनी प्रसादच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. अभिनेता महेश बेलदरने प्रसाद ओकचं म्हणण्याचं समर्थन केलंय. तसेच त्याने कमी फॉलोव्हर्स असल्यामुळे त्याला एका सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला, अशी खंतदेखील व्यक्त केली. दरम्यान प्रसाद ओकच्या वक्तव्यावर सिद्धांत सरफरे(Siddhant Sarfare)ने प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसाद ओकने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील एक स्कीट बघून त्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी त्याने म्हटले होते की, "रील्स करुन आपण अभिनेते किंवा अभिनेत्री आहोत असं ज्यांना ज्यांना वाटायला लागलंय हा प्रचंड मोठा गैरसमज समाजात पसरत चाललेला आहे. ज्यांच्या रील्सला काही हजार, मिलियन, बिलियन व्ह्यूज आहेत, फॉलोअर्स आहेत त्यांचं नाटक बघायला १० माणसंही येत नाहीत हे तथ्य आहे. त्यामुळे जर कोणाला वाटत असेल की आपण रील करुन स्टार होऊ शकतो तर हा खूप मोठा भ्रम आहे. रिल्स म्हणजे अभिनय अजिबात नाही. हा इतक्या महत्वाचा विषय अगदी हलक्या शब्दात तुम्ही मांडलात. ज्यांना कळायचं होतं शिकायचं होतं ते शिकतील नाही तर त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे. आपण आपलं काम केलं."

"नाहीतर फक्त ऑडिशन ऑडिशन ऑडिशन..."

प्रसाद ओकच्या वक्तव्यावर सिद्धांत सरफरेने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, मी अभिनेता आहे रील्सवरती जरा स्लॅपस्टिक करावं लागतं ज्याला ओव्हर म्हणतात. पण मला आता पर्यंत जे मायबाप रसिक प्रेक्षकांचे प्रतिसाद आले आहेत. माझ्या अभिनयासाठी आणि माझ्या कन्टेंटसाठी ते सर्व काही सांगून जातात. नवोदित कलाकार कसा मोठा होणार? तर असा रील्स करून स्वतःची कला लोकांपर्यंत पोहोचवून. नाहीतर फक्त ऑडिशन ऑडिशन ऑडिशन... बस्स आणि मुळात मला बोलायचं कारण हेच की मला रील्स या क्षेत्रात खूप काही अनुभवायला शिकायला आणि आपली कला सादर करायला मिळाली. रिल करणारा हा अभिनेता नसतो असं नाही. खूप चांगले कलाकार सुद्ध रिल्स करू शकतात. फरक एवढाच आहे की टेलिव्हजन, सिनेमा तसं रिल्ससुद्धा एक कलाकाराला आपली कला दाखवण्याचा मार्ग आहे.

Web Title: ''Sir, you are a legend but I...'', Siddhant Sarfare's reaction on Prasad Oak's statement on Reelstar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.