गायिका सावनी रवींद्रने चाहत्यांना दिली खुशखबर..! या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 11:27 AM2023-09-29T11:27:37+5:302023-09-29T11:28:06+5:30

Savanee Ravindra : आपल्या सुरेल स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रवींद्र हिने आतापर्यंत बरीच गाणी गायली आहेत. नुकतेच तिने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असल्याचे सांगितले.

Singer Savanee Ravindra gave good news to fans..! He made his debut in Bollywood through this film | गायिका सावनी रवींद्रने चाहत्यांना दिली खुशखबर..! या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण

गायिका सावनी रवींद्रने चाहत्यांना दिली खुशखबर..! या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण

googlenewsNext

आपल्या सुरेल स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रवींद्र (Savanee Ravindra) हिने आतापर्यंत बरीच गाणी गायली आहेत. तेलुगू, तमीळ, मराठी इंडस्ट्रीत तिने तिच्या गायनाने रसिकांना भूरळ घातली. मात्र आता नुकतेच तिने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असल्याचे सांगितले. 

सावनी रवींद्र हिने इंस्टाग्रामवर चंद्रमुखीचा पोस्टर आणि थिएटरमधील फोटो शेअर करत लिहिले की, हो.. स्वप्न सत्यात उतरलं.  चंद्रमुखी २. ज्या दिवसाची मी वर्षानुवर्षे वाट पाहत होते तो दिवस अखेर आला! बॉलिवूड गाण्याचे पदार्पण आहे. तेही दिग्गज एम.एम.किरवाणी सर यांनी रचले आहे आणि स्टनिंग कंगना राणौत मॅडमसाठी. "ये मन तुम्हें, ये तन तुम्हें" ("नी कोसमे" ची हिंदी आवृत्ती) हे गाणे माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे...मी असे म्हणेन की हे आतापर्यंतचे सर्वात कठीण गाणे आहे!

तिने पुढे म्हटले की, मित्रांनो, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पहा आणि तुम्हाला ते कसे वाटले मला कळवा! सर्व गाणी माझ्या प्रिय वैभव जोशीने अप्रतिमपणे लिहिली आहेत. माझे तुझ्यावर प्रेम आहे दादू, धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया! (P.S: हे गाणे लवकरच सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल, परंतु तोपर्यंत, #chandramukhi2 चित्रपट पहा )

'चंद्रमुखी २' आला भेटीला
 दाक्षिणात्य चित्रपट 'चंद्रमुखी' हा २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. ब्लॉकबस्टर चंद्रमुखीमध्ये रजनीकांत आणि ज्योतिका यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. चंद्रमुखीच्या पहिला भागाला प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाचा 'चंद्रमुखी २' हा दुसरा भाग आहे. २८ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात 'चंद्रमुखी 2' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Web Title: Singer Savanee Ravindra gave good news to fans..! He made his debut in Bollywood through this film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.