सिद्धार्थ का देतोय आॅडिशन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 10:30 IST2016-12-05T16:51:12+5:302016-12-06T10:30:45+5:30
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आता वडापाव बनविण्याची रेसिपी सांगतोय. आणि ती रेसिपी साधी-सुधी नाही तर एकदम मसालेदार, हॉट वडापाव कसा ...

सिद्धार्थ का देतोय आॅडिशन?
अ िनेता सिद्धार्थ चांदेकर आता वडापाव बनविण्याची रेसिपी सांगतोय. आणि ती रेसिपी साधी-सुधी नाही तर एकदम मसालेदार, हॉट वडापाव कसा बनवायचा याचे धडे तो सर्वांना देत आहे. आता तुम्ही म्हणाल कि सिद्धार्थवर वडापावची रेसीपी सांगायची वेळ का आलीय? तो कोणत्या कुकरी शो मध्ये तर दिसणार नाहीये ना? तर तसे बिलकुलच काही नाही. सिद्धार्थ सध्या अॅक्टर साला या व्हीडीओमधून वडापावची हॉट रेसिपी सांगत आहे. तो सध्या आॅडिशनही देतोय. हा व्हीडीओ आहे नवीन कलाकारांच्या आॅडिशनचा. आॅडिशन दयायची म्हणजे भल्या भल्यांना टेन्शन येते. कलाकारांच्या परीक्षेचा आणि भवितव्याचा हा प्रश्न असतो. आता सिद्धार्थ देखील पुन्हा एकदा आॅडिशन दयायला सज्ज झाला होता. या आॅडिशनमध्ये तो पास झाला की फेल हे तर आपल्याला लवकरच समजेल. परंतु त्याने वडापाव बवनिण्याची रेसीपी सांगताना जे हावभाव केले ते खरच हास्यापद होते. ही रेसीपी सांगताना त्याची देहबोली पाहून तुम्हाला पोट धरुन हसल्याशिवाय राहवणार नाहीच. सिद्धार्थ सध्या अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. लवकरच तो राजस्थानला ट्रीपला जाणार असल्याचे देखील समजतेय. सिद्धार्थला आता अशा प्रकारच्या हॉट रेसीपीज सांगायच्या संधी अनेक कुकरी शो मध्ये मिळू शकतील. त्यामुळे जर प्रेक्षकांना सिद्धार्थ एखाद्या खव्वये शो मध्ये रेसीपी सांगताना दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.