सिद्धार्थ चांदेकरने लग्नात घेतला हा भन्नाट उखाणा, मिळवली सगळ्यांची दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 12:08 IST2021-01-25T12:06:07+5:302021-01-25T12:08:36+5:30

लग्नात सिद्धार्थने घेतलेल्या उखाण्याची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

siddharth chandekar cute ukhana for mitali mayekar | सिद्धार्थ चांदेकरने लग्नात घेतला हा भन्नाट उखाणा, मिळवली सगळ्यांची दाद

सिद्धार्थ चांदेकरने लग्नात घेतला हा भन्नाट उखाणा, मिळवली सगळ्यांची दाद

ठळक मुद्देलग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट सिद्धार्थ व मिताली चाहत्यांसह शेअर करत आहेत.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरचे लग्न नुकतेच झाले. या लग्नाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  लग्नात सिद्धार्थने घेतलेल्या उखाण्याची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

सिद्धार्थने घेतलेल्या उखाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हातांमध्ये हात आले ... बोटांमध्ये बोटं... मितालीचे नाव घेतो...आता जात नाही कुठं त्याने घेतलेला हा उखाणा सगळ्यांनाच प्रचंड आवडला. 

पुण्यात सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती. नाकात नथ, हातात हिरवा चुडा, माथ्यावर बाशिंग असा तिचा लूक होता.  तर सिद्धार्थने जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेता उमेश कामत,  अभिज्ञा भावे, पूजा सावंत,  भूषण प्रधान असे अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते.  दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले होते.

लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट सिद्धार्थ व मिताली चाहत्यांसह शेअर करत आहेत. त्यांच्या हळदीचे,  मेहंदीचे,  संगीत सेरेमनीचे अनेक फोटो याआधीच व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधील सिद्धार्थ आणि मितालीच्या केमिस्ट्रीची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केलं होतं.

Web Title: siddharth chandekar cute ukhana for mitali mayekar