सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरचे लवकरच होणार लग्न, लग्नासाठी सिद्धार्थ पोहोचला पुण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 11:12 IST2021-01-20T10:59:45+5:302021-01-20T11:12:20+5:30

सिद्धार्थने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावरून त्यांचे लग्न लवकरच होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

siddharth chandekar and mitali mayekar will marry soon | सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरचे लवकरच होणार लग्न, लग्नासाठी सिद्धार्थ पोहोचला पुण्यात

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरचे लवकरच होणार लग्न, लग्नासाठी सिद्धार्थ पोहोचला पुण्यात

ठळक मुद्देसिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ गाडीतून उतरत ग्रँड एंट्री घेताना दिसत आहे. त्याच्यामागे काही मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहे.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांची मित्रमंडळी सध्या त्यांना केळवणासाठी घरी बोलावत आहे. त्यांनी त्यांच्या केळवणाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत आणि आता तर त्याच्या लग्नाची तारीख खूपच जवळ आली आहे. सिद्धार्थने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावरून त्यांचे लग्न लवकरच होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ गाडीतून उतरत ग्रँड एंट्री घेताना दिसत आहे. त्याच्यामागे काही मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहे. या व्हिडिओसोबत त्याने लिहिले आहे की, माझ्या लग्नासाठी मी पुण्यात दाखल झालो आहे. त्याच्या या व्हिडिओवर त्याची होणारी पत्नी मितालीने खूपच क्यूट कमेंट लिहिली आहे. तिने लिहिले आहे की, अरे आओ ना फिर... 

या दोघांचं लग्न पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर असलेल्या एका जुन्या वाड्यामध्ये होणार आहे. या दोघांच्या लग्नाची तारीख गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. पण सध्याची लग्नाच्या तयारीचे लगबग पाहाता त्यांचे लवकरच लग्न होणार आहे. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

‘उर्फी’ चित्रपटातून मितालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीनं काम केलं. तर ‘गुलाबजाम’, ‘क्लासमेट’ यांसारखे अनेक चित्रपट ‘अग्निहोत्र’, ‘प्रेम हे’ यांसारख्या मालिकेतून सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केलं होतं. 

Web Title: siddharth chandekar and mitali mayekar will marry soon