सिद्धार्थ चांदेकर सांगतोय, मी आणि मिताली दोन वर्षं लीव्ह इनमध्ये राहात होतो... पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 12:30 IST2021-02-04T12:27:43+5:302021-02-04T12:30:09+5:30

सिद्धार्थ चांदेकरने लग्नापूर्वी सुलेखा तळवलकरांच्या दिल के करीब या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या आणि मितालीच्या नात्याविषयी काही खास गोष्टी या कार्यक्रमात सांगितल्या होत्या.

Siddharth Chandekar and mitali mayekar was in leave in relationship for two years said in sulekha talwalkar show | सिद्धार्थ चांदेकर सांगतोय, मी आणि मिताली दोन वर्षं लीव्ह इनमध्ये राहात होतो... पण...

सिद्धार्थ चांदेकर सांगतोय, मी आणि मिताली दोन वर्षं लीव्ह इनमध्ये राहात होतो... पण...

ठळक मुद्देसिद्धार्थने या कार्यक्रमात सुलेखाशी गप्पा मारताना सांगितले होते की, आम्ही दोन वर्षं लीव्ह इन मध्ये राहात होतो. पण लग्न होणार या विचाराने मला थोडं गडबडल्यासारखे होतेय. माझी बॅचलर लाईफ संपणार याचे मला टेन्शन आले आहे.

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर गेल्या २४ जानेवारीला लग्नबंधनात अडकले. पुण्यातील ढेपे वाडा येथे मोठ्या थाटामाटात हा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नाला आठवडा झाल्यानंतर मिताली आणि सिद्धार्थ त्यांच्या लग्नातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले होते. सौभाग्याची मंगलघटिका या कॅप्शनसह मितालीने लग्नाचा अतिशय सुंदर व्हिडीओ पोस्ट केला होता.

सिद्धार्थ चांदेकरने लग्नापूर्वी सुलेखा तळवलकरांच्या दिल के करीब या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या आणि मितालीच्या नात्याविषयी काही खास गोष्टी या कार्यक्रमात सांगितल्या होत्या. सिद्धार्थने या कार्यक्रमात सुलेखाशी गप्पा मारताना सांगितले होते की, आम्ही दोन वर्षं लीव्ह इन मध्ये राहात होतो. पण लग्न होणार या विचाराने मला थोडं गडबडल्यासारखे होतेय. माझी बॅचलर लाईफ संपणार याचे मला टेन्शन आले आहे. लग्न करून आता एक व्यक्ती माझ्या घरी येणार आहे हे फिलिंग खूपच विचित्र आहे. आम्ही दोन वर्षं एकत्र राहात असल्याने आमच्यात काही फरक पडणार नाहीये. पण लग्न झाल्यानंतर आम्ही नवरा-बायको बनणार आहोत. या नात्यात काही जबाबदाऱ्या येतात. दोन कुटुंब एकत्र येतात. खरं तर याचं एकीकडे टेन्शन आले आहे. पण दुसरीकडे हे सगळे आम्ही एन्जॉय करणार याची मला खात्री आहे. 

सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या कलाकारांनीदेखील सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. लग्नानंतर सिद्धार्थ आणि मिताली लोणावळा येथील मचान या रिसॉर्टला गेले होते. दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले होते.

Web Title: Siddharth Chandekar and mitali mayekar was in leave in relationship for two years said in sulekha talwalkar show