सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या लग्नाला ३ वर्षे पूर्ण, अभिनेत्याची खास पोस्ट, म्हणाला - "मी जे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 01:38 PM2024-01-24T13:38:40+5:302024-01-24T13:38:58+5:30

Siddharth Chandekar And Mitali Mayekar : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल आहेत. या दोघांचे फॅन फॉलोव्हिंग खूप आहे आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Siddharth Chandekar and Mitali Mayekar complete 3 years of marriage, actor's special post, says - ''I J...'' | सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या लग्नाला ३ वर्षे पूर्ण, अभिनेत्याची खास पोस्ट, म्हणाला - "मी जे..."

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या लग्नाला ३ वर्षे पूर्ण, अभिनेत्याची खास पोस्ट, म्हणाला - "मी जे..."

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल आहेत. या दोघांचे फॅन फॉलोव्हिंग खूप आहे आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. ते बऱ्याचदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. दरम्यान आज त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस आहे. या निमित्ताने सिद्धार्थ चांदेकरने पत्नी मितालीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने इंस्टाग्रामवर मितालीसोबतचा लग्नाचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, थ्री इयर्स, थ्री चिअर्स, टू अस. हॅप्पी अॅनिव्हर्सरी बायको. मी जे आहे, तेच आहे कारण माझ्या पाठिशी तू खंबीरपणे उभी आहेस. कृतज्ञ. अभिनेत्याच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

सिद्धार्थ आणि मितालीने पुण्याच्या ढेपेवाड्यात २४ जानेवारी, २०२१ मध्ये लग्न केले. मितालीला प्रेमाने Tiny असं सिद्धार्थ म्हणतो आणि कुंफू पांडा सिनेमातील पांडाप्रमाणे सिद्धार्थ आहे असं मितालीला वाटतं, त्यामुळे त्याला ती Panda म्हणते. टायनी पांडाची ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत असते. दोघांचे व्हिडीओ ट्रेंड होत असतात.

वर्कफ्रंट..
सिद्धार्थ चांदेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तो श्रीदेवी प्रसन्न चित्रपटात दिसणार आहे. यात त्याच्यासोबत सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. श्रीदेवी प्रसन्न' हा चित्रपट २ फेब्रुवारी, २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिताली मयेकर शेवटची लाडाची लेक मालिकेत पाहायला मिळाली होती. 

Web Title: Siddharth Chandekar and Mitali Mayekar complete 3 years of marriage, actor's special post, says - ''I J...''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.