Video: 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान प्रेक्षकांना मिळालं खास सरप्राइज, दिल्या 'हर हर महादेव'च्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 15:39 IST2025-11-09T15:39:16+5:302025-11-09T15:39:57+5:30
महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. सिद्धार्थच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत असून 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'चे शो हाऊसफूल होत आहेत.

Video: 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान प्रेक्षकांना मिळालं खास सरप्राइज, दिल्या 'हर हर महादेव'च्या घोषणा
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा ३१ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमातून शेतकरी आत्महत्यासारख्या गंभीर आणि महत्त्वाच्या आयुष्यावर भाष्य केलं गेलं आहे. महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. सिद्धार्थच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत असून 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'चे शो हाऊसफूल होत आहेत.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सिनेमाचा शो सुरू असताना प्रेक्षकांना एक खास सरप्राइज मिळालं. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाच्या शेवटी अभिनेता सिद्धार्थ बोडके आणि सिद्धार्थ जाधव यांनी थिएटरमध्ये उपस्थिती दर्शवली. ते पाहून प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. दोन्ही सिद्धार्थला पाहून प्रेक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव अशा घोषणा दिल्या. सिद्धार्थ बोडकेने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाचं बजेट हे १३ कोटी आहे. या सिनेमात सिद्धार्थ जाधव, मंगेश देसाई, पृथ्विक प्रताप, रोहित माने, सयाजी शिंदे, शशांक शेंडे, बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.