सिध्दार्थ आणि सखीचा मान्सून एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 15:34 IST2016-07-05T09:25:19+5:302016-07-05T15:34:59+5:30

 Exculsive - बेनझीर जमादार सध्या दोन दिवस पावसाची लगबग पाहता, सर्वाना मस्तपैकी कुठेतरी ट्रीप काढावी असे प्लॅनिंग चालू असतीलच. ...

Siddharth and Sakhi Manasun Enjoy | सिध्दार्थ आणि सखीचा मान्सून एन्जॉय

सिध्दार्थ आणि सखीचा मान्सून एन्जॉय

ong> Exculsive - बेनझीर जमादार

सध्या दोन दिवस पावसाची लगबग पाहता, सर्वाना मस्तपैकी कुठेतरी ट्रीप काढावी असे प्लॅनिंग चालू असतीलच. तसेच सलग दोन ते तीन दिवस लोणावळा येथे पर्यटकांची झुंबड उडलेली दिसत आहे.असे हे चित्र पाहिले असता,  पावसात मनसोक्त भिजून यावे अशी इच्छा देखील प्रत्येकाची  झाली असेल. अशीच इच्छा सिध्दार्थ चांदेकर आणि सखी गोखलेची झालेली दिसत आहे. आपले हे लाडके कलाकार देखील या पावसाचा  मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे. अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि अभिनेत्री सखी गोखले हे दोन कलाकारांनी मान्सून एन्जॉय केला ते अलीबाग या ठिकाणी. हे दोघे ही एकदम मनसोक्त पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे. त्यांची ही ट्रीप देखील एकदम हटके दिसत आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल हे दोघ एकत्र कसे? तर या दोघे एका चित्रपटात एकत्र झळकणार असल्याची माहिती कळते. तसेच सखी गोखले देखील दिल दोस्ती दुनियादारीनंतर अभिनेता सिध्दार्थ चांदेकरसोबत चित्रपटात पदापर्ण करत आहे. त्यामुळे ही मस्त व हटके जोडी प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.



 

Web Title: Siddharth and Sakhi Manasun Enjoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.