सिया पाटील साकारणार आव्हानात्मक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 17:32 IST2017-02-23T12:02:34+5:302017-02-23T17:32:34+5:30

प्रत्येक कलाकाराला आव्हानात्मक  भूमिका करण्याची इच्छा असते. कारण आवानात्मक भूमिकेतून त्या कलाकाराच्या अभिनयाची खरी परिक्षा असते. म्हणूनच अभिनेत्री सिया ...

Sia Patil will play a challenging role | सिया पाटील साकारणार आव्हानात्मक भूमिका

सिया पाटील साकारणार आव्हानात्मक भूमिका

रत्येक कलाकाराला आव्हानात्मक  भूमिका करण्याची इच्छा असते. कारण आवानात्मक भूमिकेतून त्या कलाकाराच्या अभिनयाची खरी परिक्षा असते. म्हणूनच अभिनेत्री सिया पाटील हिची आव्हानात्मक भूमिका करण्याची प्रतिक्षा आता संपली आहे. सिया ही गर्भ या चित्रपटाच्या माध्यमातून आव्हानात्मक भूमिका करण्यास सज्ज झाली आहे. तिचा हा चित्रपट  १७ मार्चला प्रदर्शित होणार आहे. श्री स्वामी वक्रतुंड फिल्मस निर्मिती संस्थेच्या राजेंद्र आटोळे यांनी गर्भ या कौटुंबिकपटाची निर्मिती केली आहे तर सहनिर्मिती शंकर शेट्टी (कोट्टारी) व राजू कोटारी अजरी यांनी केली आहे.  दिग्दर्शन सुभाष घोरपडे यांनी केले आहे.
   
        गर्भ या स्त्रीप्रधान चित्रपटात सिया कविता ही मध्यवर्ती भूमिका साकारतेय. आजवर सियाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या असल्या तरी गर्भमध्ये सियाने कविता या व्यक्तिरेखेतून एका स्त्रीचा संपूर्ण प्रवास रेखाटला आहे. साधी सरळ, मेहनती कविता कॉलेजमध्ये प्रेमात पडते, समंजस असा जोडीदार तिला लाभतो अर्थात पुढे अशा काही घटना घडतात की, कविताला अनेक संघषार्चा सामना करावा लागतो. मुलगी, पत्नी, आई, सून अशा विविध नात्यातील बंध आपल्याला या चित्रपटातून पहायला मिळणार आहेत. चित्रपटाची वेगळ्या धाटणीची कथा रमेश तिवारी यांनी लिहिली असून पटकथा धीरज डोकानिया, रमेश तिवारी यांनी लिहिली आहे. या चित्रपटात सिया पाटीलसोबत सुशांत शेलार, निशिगंधा वाड, अनंत जोग, यतीन कार्येकर, वंदना वाकनीस, पल्लवी वैद्य आदी कलाकारांचा समावेश आहे. तसेच आरजे दिलीप गर्भ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत असल्याचे कळत आहे. 

Web Title: Sia Patil will play a challenging role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.