श्यामपट कलाकृती करतेय समाजप्रबोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 15:45 IST2017-02-12T10:15:03+5:302017-02-12T15:45:03+5:30

नाटक, चित्रपट असे अनेक माध्यम नेहमीच समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतात. या गोष्टींचा समाजाला फायदादेखील झालेले पाहायला मिळतात. समाजात ...

Shyampant artwork is socialization | श्यामपट कलाकृती करतेय समाजप्रबोधन

श्यामपट कलाकृती करतेय समाजप्रबोधन

टक, चित्रपट असे अनेक माध्यम नेहमीच समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतात. या गोष्टींचा समाजाला फायदादेखील झालेले पाहायला मिळतात. समाजात एखादा प्रबोदनात्मक संदेश नागरिकांपर्यत पोहोचवायचा असेल तर नाटक, चित्रपट, लघुपट अशी अनेक माध्यमे सोईस्कर असल्याचे पाहायला मिळतात. आता हेच पाहा ना, योगेश सोमण लिखित श्यामपट ही कलाकृती समाजप्रबोधन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 
भरतमुनी जयंतीनिमित्त संस्कार भारतीतर्फे शनिवारी  संपूर्ण देशभर एकाच दिवशी, एकाच वेळी श्रीकृष्ण जीवनदर्शन देणारी कलाकृती सादर केली गेली आहे. विविध कलाकारांच्या माध्यमातून ७०० ठिकाणी हा प्रयोग पार पाडला आहे. या उपक्रमांतर्गत पुणे महानगर नाट्यविधातर्फे योगेश सोमण लिखित आणि दिग्दर्शित श्यामपट ही कलाकृती सादर करण्यात आली आहे.
 
      महाभारत रचत असताना पात्रांना दिलेल्या अवास्तव स्वातंत्र्याने ती आपापल्या भूमिकेची मयार्दा ओलांडतात आणि महाकाव्यात अघटित घडू लागते. अखेरीस व्यासमुनी श्रीकृष्णाच्या हातात महाभारत सोपवतात. त्यानंतर होणाºया नाट्याचे सादरीकरण श्यामपटमध्ये आहे. या नाट्यकृतीमध्ये ४० कलाकार सहभागी झाले असून, प्रयोगाचा कालावधी दीड तास आहे. त्यांची २ महिने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती योगेश सोमण यांनी दिली संस्कार भारती ही अखिल भारतीय संघटना गत ३५ वर्षांपासून संगीत, नाटक, नृत्य, साहित्य, चित्रकला, रांगोळी या कलांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून समाजात प्रबोधन करीत आहे. भरतमुनी जयंतीनिमित्त देशाच्या विविध भागांत श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित नाट्य, गाणी, व्याख्याने आदी कार्यक्रम सादर होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम  समाजप्रबोधनाची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. श्यामपट ही कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 

Web Title: Shyampant artwork is socialization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.