अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्रा दिसणार लघुपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 15:30 IST2017-01-19T15:29:07+5:302017-01-19T15:30:20+5:30
प्रेक्षकांची लाडकी जोडी अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्रा लवकरच एका लघुपटात झळकणार आहे. ही जोडी आता, भागवत चक्र या ...
.jpg)
अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्रा दिसणार लघुपटात
प रेक्षकांची लाडकी जोडी अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्रा लवकरच एका लघुपटात झळकणार आहे. ही जोडी आता, भागवत चक्र या लघुपटात दिसणार आहे. हा हिंदी लघुपट असणार आहे. या लघुपटातदेखील हे दोघे नवरा बायकोची भूमिका साकारताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या जोडीने नच बलिए या रियालिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याचबरोबर त्यांनी नच बलिए ७ चे विजेतेदेखील होते. या रियालिटी शोनंतर या दोघांना पुन्हा एकत्रित पडदयावर पाहाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता या लघुपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. या दोघांव्यतिरिक्त लघुपटात आणखी कोण कलाकार असणार आहे हे अदयाप कळाले नाही. तसेच त्यांचा हा लघुपट कशावर आधारित असणार आहे हेदेखील गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र प्रेक्षकांना या हिंदी लघुपटातून रियल लाइफ जोडी आता रील लाइफ पाहायला मिळणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट असणार आहे. अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्रा या दोघांनी नच बलिए या रियालीटी शोच्या माध्यमातून आपल्या नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच सध्या अमृता ही मॅड या रियालिटी डान्स शोची परिक्षकाची जबाबदारी पेलताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तिने यापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीला कटयार काळजात घुसली, वन वे तिकीट, वेलकम जिंदगी, बाजी, गोलमाल, साडे माडे तीन अशा अनेक चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविताना दिसली.