/> निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांचा मुलगा दृष्यंत तसा लाईमलाईटपासून लांबच असतो. आई-वडिल दोघेही मराठी चित्रपटसृष्टीतील स्टार्स असले तरी या झगमगाटापासून दृष्यंत दूरच असल्याचेच दिसून येते. निवेदिता जोशी मात्र सध्या नाटकाच्या प्रयोगांमध्ये चांगल्याच व्यस्त आहेत. पण तरीही आपल्या लाडक्या लेकासाठी वेळ काढीत या माय-लेकांनी चांगलीच शॉपिंग केल्याचे दिसत आहे. नूकतेच सोशल मिडियावर निवेदिता आणि दृष्यंतचे झक्कास शॉपिंग करतानाचे फोटो वायरल झाले आहेत. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांची सोबत एन्जॉय करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. सेल्फी, हॉटेलिंग आणि मस्तपैकी शॉपिंग करण्याचा मनमुराद आनंद या दोघांनीही लुटला आहे.
![]()