'रूप नगर के चीते' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात, कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 06:27 PM2021-02-24T18:27:10+5:302021-02-24T18:27:55+5:30

'रूप नगर के चीते' या लक्षवेधी शीर्षक असलेल्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला.

Shooting of 'Roop Nagar Ke Chite' begins | 'रूप नगर के चीते' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात, कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात

'रूप नगर के चीते' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात, कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात

googlenewsNext

अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीतही कामाला वेग आला आहे. आगामी 'रूप नगर के चीते' या लक्षवेधी शीर्षक असलेल्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात संपन्न झाला. बॅालिवूडमधील सुप्रसिद्ध फिल्ममेकर विपुल अमृतलाल शाह यांचे पुतणे संगीतकार मनन शाह यांनी एस एण्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली 'रूप नगर के चीते' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन विहान सूर्यवंशी करीत आहेत. पुणे शहर आणि परिसरात चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

बॉलिवूडमधील अरजित सिंग, अतीफ असलम, राहत फतेह अली खान, अरमान मलिक यांसारख्या आघाडीच्या गायकांसोबत मनन शाह यांनी संगीतकार म्हणून काम केले आहे. ‘अखियाँ मिलावांगा’, ‘तेरे लिये’, ‘सावन बैरी’ यांसारखी बॉलीवूडमधील अनेक हिट रोमँटिक गाणी मनन शाह यांनी संगीतबद्ध केली आहेत. ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबतही ही त्यांनी खूप काम केले आहे. बॉलीवूडचे हिट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या ‘स्कूल, कॉलेज आणि लाईफ’ या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केलेल्या युवा दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी 'रूप नगर के चीते' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मनन शाह आणि विहान सूर्यवंशी ही जोडगोळी मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवायला सज्ज झाली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा व रोमांचक अनुभव असेल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला आहे.

'रूप नगर के चीते' हा चित्रपट दोन बालमित्रांचा रोमहर्षक प्रवास आणि एका घटनेनंतर त्यांचं दोन भिन्न शहरांतील विरोधाभासी जीवन दर्शवणारा आहे. मैत्रीतील आजवर कधीही न उलगडलेले काही दुर्लक्षित पैलू यात सादर करण्यात आले आहेत.

हटके शीर्षक असलेल्या या चित्रपटाचे उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटातील दोन मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या भूमिका पडद्यावर कोण साकारणार? याबद्दल औत्सुक्य निर्माण झाले आहे. २०२१ च्या अखेरीस 'रूप नगर के चीते'  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Shooting of 'Roop Nagar Ke Chite' begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.