असे पार पडले तळ्यातील शूटींग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 11:52 IST2018-03-17T06:21:03+5:302018-03-17T11:52:39+5:30

'द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट' प्रस्तुत व चित्राक्ष फिल्म्स निर्मित ‘बबन’ सिनेमा येत्या २३ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ‘ख्वाडा’ ...

This is the shooting in the pool! | असे पार पडले तळ्यातील शूटींग!

असे पार पडले तळ्यातील शूटींग!

'
;द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट' प्रस्तुत व चित्राक्ष फिल्म्स निर्मित ‘बबन’ सिनेमा येत्या २३ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ‘ख्वाडा’ फेम दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित या सिनेमात गावातल्या नद्या, वस्त्या, तळी आणि हिरव्यागार शेतांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या सिनेमातील ‘जगण्याला पंख फुटलंय’ हे रॉमेंटिक गाणे एका तळ्यात शूट करण्यात आले आहे. तळ्यातील एका तराफ्यावर भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव एकत्र बसले असल्याचे ते चित्रीकरण होते. डोळ्याला सुखावणा-या या निसर्गरम्य दृश्यांचे चित्रीकरण करण्याचा भन्नाट किस्सा भाऊसाहेब इथे सांगतात. ‘पोहता येत नसलेली व्यक्ती तलाव, विहिरीत कधी उतरूच शकत नाही असा माझा अनुभव आहे. कारण त्या व्यक्तींना आपण बुडू अशी सतत भीती वाटत असते. त्यामुळे सिनेमाच्या शूटिंगआधी गायत्रीला पोहणं शिकण्यासाठी मी सांगितलं होतं. एका गाण्यासाठी आम्हाला तळ्याचे चित्रीकरण करायचे होते. त्यानुसार ठरल्याप्रमाणे तळ्यामध्ये शूटिंगची आमची सगळी तयारी झाली. गायत्री, भाऊ असे सगळे कलाकार आम्ही जमलो. मात्र अचानक गायत्रीनं तळ्यातील पाण्याकडे एक नजर टाकून त्यात उतरण्यास नकार दिला. मला कळेचना, हिला झालं तरी काय एवढं अचानक.तेव्हा तिनं आपल्याला पोहणं येत नसल्याचं सांगितलं. मग मी तिला म्हटलं की ही गोष्ट तू आधी का सांगितली नाहीस? त्यावरचं तिचं उत्तर होतं- ‘मला पोहणं येत नाही असं तुम्हाला कळलं असतं तर कदाचित तुम्ही मला सिनेमातून काढून टाकलं असतं.म्हणून मी पोहता न येण्याची गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवले.’ भाऊराव सांगतात कि, तिचं हे उत्तर ऐकून आम्ही सगळ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला होता. अशावेळी, आता काय करायचं असा मोठा प्रश्‍न ‘बबन’ च्या टीमला पडला. शुटींगची सर्व तयारी झाली असल्यामुळे आणि दिवस वाया घालवायचा नसल्यामुळे भाऊरावांनी ती पाण्यात जरी उतरली तरी तिला बुडू न देण्याचा विश्‍वास दिला. तराफा खूप बारीक असल्यामुळे गायत्रीला पाण्यात पडण्याची भीती वाटत होती. तिच्या मनातील ती भीती काढण्यासाठी एका जबाबदार दिग्दर्शकाच्या नात्याने भाऊराव स्वतः पाण्यात उतरले. तसेच त्यांच्याबरोबर गावातील आणखी वीसएक पट्टीची पोहणारी तरुण मुलंदेखील तळ्यात उतरवली होती. या सगळ्या मुलांना तराफ्याच्या आजूबाजूला गायत्रीच्या सुरक्षिततेसाठी पाण्यात पोहायला सांगितले होते.त्यानंतर निर्धास्त होत गायत्रीने भाऊसोबतचा तराफ्यावरील सीन पूर्ण केला. ‘भाऊराव सांगतात कि, ‘तळ्यातील आमचं शूटिंग पूर्ण होण्यास चार तास लागले. पोहता न येताही गायत्री पाण्यात उतरल्याबद्दल तिला माझा हॅट्स ऑफ.


 

Web Title: This is the shooting in the pool!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.