धक्कादायक! एका बीएमडब्ल्यूच्या ड्रायव्हरने सुमीत राघवनची पत्नी चिन्मयी सुमीत समोर केले हस्तमैथुन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 16:59 IST2018-02-19T11:29:40+5:302018-02-19T16:59:40+5:30
सुमीत राघवनने त्याच्या ट्विटरच्या अकाऊंटवरून नुकतीच एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. त्याने काही तासांपूर्वी एक ट्वीट करून त्यात म्हटले ...
.jpg)
धक्कादायक! एका बीएमडब्ल्यूच्या ड्रायव्हरने सुमीत राघवनची पत्नी चिन्मयी सुमीत समोर केले हस्तमैथुन
स मीत राघवनने त्याच्या ट्विटरच्या अकाऊंटवरून नुकतीच एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. त्याने काही तासांपूर्वी एक ट्वीट करून त्यात म्हटले आहे की, बीएमडब्ल्यू गाडी ज्याचा शेवटचा नंबर १९८५ आहे, त्या गाडीचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. या गाडीच्या ड्रायव्हरने राखाडी रंगाची सफारी घातली होती आणि ही गाडी विलेपार्ले येथील पार्ले टिळक स्कूलच्या समोर उभी होती. या ड्रायव्हरने माझ्या पत्नीसमोरच हस्तमैथुन करायला सुरुवात केली. ती त्याला मारण्याच्या आतच तो गाडी घेऊन पसार झाला. तो इतका जलद गतीने गेला की, माझ्या पत्नीला गाडीचे शेवटचे चार नंबरच पाहायला मिळाले.
मुंबईत दररोज अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत. या घटना सार्वजनिक ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात घडत आहेत. सुमीतने त्याची पत्नी चिन्मयी सुमीत सोबत घडलेला प्रसंग ट्विटरवर सांगून मुंबई पोलिसांकडून मदत मागितली आहे. त्याने स्थानिक पोलिस स्टेशन आणि ट्रफिकमध्ये देखील या विरोधात तक्रार नोंदवली आहे. त्याच्या पत्नीसमोर जो प्रकारे घडला तो नेहमीच त्या शाळेतील मुलींसमोर घडत असेल अशी शक्यता देखील त्याने त्याच्या ट्वीटमध्ये वर्तवली आहे.
सुमीत राघवनने साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेत साहिल ही भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तसेच हद कर दी, सजन रे झुठ मत बोलो, बडी दूर से आये है या मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. तसेच हॉलिडे, माय नेम इज खान, यु मी और हम या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. सध्या तो माधुरी दीक्षित सोबत बकेट लिस्ट या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. तसेच त्याचा आपला मानूस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. सुमीतची पत्नी चिन्मयी सुमीत ही एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे.
Also Read : बडे दूर से आये है या मालिकेच्या टीमने केले रियुनियन