शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 21:49 IST2016-03-09T04:49:50+5:302016-03-08T21:49:50+5:30

               सारा एंटरटेन्मेंट निर्मित, विद्रोही जलसाच्या सहकायार्ने रंगमळा सादर करीत असलेल्या नंदू माधव ...

Shivaji Underground in Bhimnagar Mohalla | शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला

शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला


/>
               सारा एंटरटेन्मेंट निर्मित, विद्रोही
जलसाच्या सहकायार्ने रंगमळा सादर करीत असलेल्या नंदू माधव दिग्दर्शित आणि
भगवान मेदनकर यांची निर्मिती असलेल्या ह्लशिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर
मोहल्लाह्व या नाटकाचे तब्बल ४५०हून अधिक प्रयोग रंगभूमीवर गाजले असून अनेक
पुरस्कारांवर ही या नाटकाने आपली मोहोर उमटवली आहे. नुकताच बालगंधर्व
नाट्यमंदिर पुणे येथे या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. या
प्रयोगाला न भूतो न भविष्य असा कोणत्याही नाटकाला रसिक प्रेक्षकांचा
उदंड प्रतिसाद मिळाला नव्हता. तसा या नाटकाला रसिकांचा प्रतिसाद मिळाला.
रंगमंदिराच्या स्टेजवर बसून रसिकांनी तर खुर्चीच्या बाजूला खाली बसून
प्रेक्षकांनी हे नाटक पाहिले. एवढा मोठा प्रतिसाद पाहून नाटकातील कलाकार
व निमार्ते भगवान मेदनकर अक्षरश: भाराहून गेले होते. या नाटकाचा विदर्भ व
मराठवाडा दौरा नुकताच झाला तिकडे हि रसिकांचा उंदड प्रतिसाद मिळाला. या
नाटकाची गीते  संकल्पना व संगीत  संभाजी भागत, लेखक राजकुमार तागडे
आहे.  या नाटकाचा विषय मनाला भिडणारा असा असून कलाकारांचा अभिनयही उत्तम असल्याचे मत नाटकाला रसिक प्रेक्षकांनी
याप्रसंगी व्यक्त केले. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या
नाटकाबद्दल एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, हे नाटक खरा शिवाजी हा कुठल्या एका जातीचा,धमार्चा, समाजाचा किवा प्रांताचा नसून ते कष्टकत्यार्चा, पिडितांचा आणि शोषितांचा व यासोबतच माणूस म्हणून
माणसाप्रमाणे जगणा?्याचा   होता. आजही जे ही माणुसकी टिकवण्यसाठी
जातीधर्माच्या पलिकडे जाऊन माणुसकीसाठी लढत आहेत त्यांचात तो जिवंत आहेत, राजे कुठलेही दैवी अवतार नसून ते एक माणूस होते ही खूप महत्वाची बाब डोळ्यासमोर आणण्याचे काम हे नाटक करते.आजच्या समाज व्यवस्थेसमोर जातीयतेची जी भिंत उभी आहे ते पाडण्याची ही एक अप्रतिम चळवळ म्हणजे हे नाटक आहे. असे नाटकाचे निमार्ते भगवान मेदनकर यांनी सांगितले.

Web Title: Shivaji Underground in Bhimnagar Mohalla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.