छत्रपती शिवाजी महाराजांवर बनवला जाणार प्रभो शिवाजी राजा हा अॅनिमेटेड चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 10:04 IST2017-04-22T04:34:24+5:302017-04-22T10:04:24+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित अनेक नाटकं, मालिका चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. महाराष्ट्रातील लोक तर शिवाजी महाराजांना ...

छत्रपती शिवाजी महाराजांवर बनवला जाणार प्रभो शिवाजी राजा हा अॅनिमेटेड चित्रपट
छ ्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित अनेक नाटकं, मालिका चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. महाराष्ट्रातील लोक तर शिवाजी महाराजांना दैवत मानतात. त्यामुळे त्यांच्या पराक्रमाविषयी जाणून घेण्याची इच्छा त्यांना नेहमीच असते. त्यामुळे त्यांच्या गाथा सांगणारे ही नाटके, चित्रपट, मालिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच शिवाजी महाराजांविषयी प्रचंड आदर आहे. त्यामुळे सगळ्यांच्या मनातच त्यांच्याविषयी खूप उत्सुकता असते. शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा सांगणारा एक चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार असून हा एक अॅनिमेटेड चित्रपट असणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत बनवला जाणार आहे.
अॅनिमेशन चित्रपटांचे क्रेझ सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच आपल्याला पाहायला मिळत आहे. हनुमान, गणपती या देवतांच्या आयुष्यावर आधारित अनेक अॅनिमेटेड चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत आणि आता शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित अॅनिमेटेड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
शिवाजी महाराजांच्या या चित्रपटाचे नाव प्रभो शिवाजी राजा असे असून या चित्रपटाचे दिग्दर्शन निलेश मुळे करणार आहेत तर या चित्रपटाचे लेखन समीर मुळे यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची पटकथादेखील निलेश मुळे यांची आहे.
प्रभो शिवाजी राजा या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची अद्याप चित्रपटाच्या टीमकडून काहीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे.