महाराजांची शौर्यगाथा उलगडणारा शिव छत्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 12:53 IST2016-12-12T12:53:45+5:302016-12-12T12:53:45+5:30

 शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आजपर्यंत अनेक मालिका आणि चित्रपट येऊन गेले आहेत. आता पुन्हा एकदा महाराजांची ही शोर्यगाथा पडदयावर पाहण्याचे ...

Shiva Chhatrapati Shivaji Maharaj's bravery | महाराजांची शौर्यगाथा उलगडणारा शिव छत्रपती

महाराजांची शौर्यगाथा उलगडणारा शिव छत्रपती

 
िवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आजपर्यंत अनेक मालिका आणि चित्रपट येऊन गेले आहेत. आता पुन्हा एकदा महाराजांची ही शोर्यगाथा पडदयावर पाहण्याचे भाग्य प्रेक्षकांना मिळणार आहे. मंदिरं थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली वाºयांची कोवळी झुळूक दºयाखोºयात दरवळली. जिजाऊ पोटी मराठ्यांचा राजा अवतरला सांगत मुकी पाखरही किलबिलली. नगारा वाजला, शाहिरी साज चढला डंका डोंगरा आड सांगत सुटला, आता सह्याद्रीवर भगवा फडकणार.!!!! मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकणार. असे म्हणत आता शिव छत्रपती या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर जिवंतपणे उभा करणारा शिव छत्रपती ह्या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. उदय सोनवणे, सचिन राऊत, पंकज देशमुख, श्वेता काळे, सिध्दार्थ शिळीमकर, अभिजीत कदम, अबोली साठे, तेजस्विनी एडके, निखील मराठे, सोमेश्वर काळजे या कलाकारांच्या भूमिका शिव छत्रपती मध्ये पाहायला मिळणार आहेत. साहस बर्फे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अमृता कदम यांनी याची कथा लिहिली असून धनंजय शिळीमकर यांनी कला दिग्दर्शन केले आहे. ग्रे पार्क स्टुडिओचे संगीत लाभलेला शिव छत्रपती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.नुकताच रितेश देशमुखच्या छत्रपती शिवाजी या चित्रपटाची चर्चा रेगली होती. या चित्रपटातील रितेशच्या लुकविषयी आणि कलाकारांविषयी नक्कीच प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता शइव छत्रपती या चित्रपटामध्ये नक्की काय देखावणार याकडे देखील प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Shiva Chhatrapati Shivaji Maharaj's bravery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.