​'बंदूक्या' चित्रपटात शशांक शेंडे दिसणार एका वेगळ्याच भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 09:13 IST2017-08-31T03:43:27+5:302017-08-31T09:13:27+5:30

अयssss  सुंदरा बाय!... असा गावरान हेल काढत हाक देणाऱ्या डोरल्याला पाहिलं की, खळखळून हसू येतं. 'बंदूक्या' सिनेमातील डोरल्या म्हणजेच ...

Shashanka Shende will appear in a different role in the film 'Gunjya' | ​'बंदूक्या' चित्रपटात शशांक शेंडे दिसणार एका वेगळ्याच भूमिकेत

​'बंदूक्या' चित्रपटात शशांक शेंडे दिसणार एका वेगळ्याच भूमिकेत

ssss  सुंदरा बाय!... असा गावरान हेल काढत हाक देणाऱ्या डोरल्याला पाहिलं की, खळखळून हसू येतं. 'बंदूक्या' सिनेमातील डोरल्या म्हणजेच अभिनेता शशांक शेंडे यांचा अनोखा अंदाज पहिल्यांदाच या चित्रपटात प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. जवळपास २० वर्षं सातत्याने हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या शशांक शेंडे यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक माजिद मजिदी यांच्या सिनेमात आपल्या अभिनयाची जादू पसरवली आहे. त्यांच्या खुमासदार आणि चोख अभिनयाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली जातेय, याचं नक्कीच करावं तेवढं कौतुक कमी आहे. १ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या राहुल चौधरी दिग्दर्शित 'बंदूक्या' सिनेमातील 'डोरल्या' देखील त्यांच्या अशाच अप्रतिम अभिनयाचे उदाहरण आहे. जुंदरी झटका दाखवणाऱ्या बंदूक्यातील डोरल्याबद्दल शशांक सांगतात, बंदुक्या सिनेमाचं वैशिष्ट्य त्याच्या भाषेत आणि कथेत आहे. बरं जुंदरी झटका म्हणजे काय?... तर सिनेमाच्या भाषेची पार्श्वभूमी जुन्नर तालुक्यातील आहे. हा तालुका पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांना लागून असल्यामुळे जुन्नर भागातील बोलीभाषेत या तिन्ही जिल्ह्यातील भाषेची सरमिसळ पाहायला मिळते. त्यामुळे ही भाषा बंदूक्याचे विशेष आकर्षण ठरली आहे, 'डोरल्या' ही भूमिका साकारताना मला देखील हे जाणवले. बिनधास्त बेधडक आणि तोंडातून तिखट शब्दांचा मारा करणारा डोरल्या ही माझ्या इतक्या वर्षांच्या काळातील एक वेगळी भूमिका आहे. शशांक शेंडे यांच्या बरोबरच आतिशा नाईक, नामदेव मुरकुटे आणि निलेश बोरसे यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा १ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Also Read : ‘चित्रपटसृष्टीनं मला माणूस म्हणून घडवलं’ - अतिषा नाईक 

Web Title: Shashanka Shende will appear in a different role in the film 'Gunjya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.