शरद केळकर झळकणार जॉन अब्राहिमसोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 04:51 IST2016-03-08T11:14:30+5:302016-03-08T04:51:44+5:30
संघर्षयात्रा या चित्रपटातून गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिकेत असणारा अभिनेता शरद केळकर आता, निशिकांत कामत दिग्दर्शित रॉकी हॅण्डसम या चित्रपटात ...

शरद केळकर झळकणार जॉन अब्राहिमसोबत
स घर्षयात्रा या चित्रपटातून गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिकेत असणारा अभिनेता शरद केळकर आता, निशिकांत कामत दिग्दर्शित रॉकी हॅण्डसम या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात बॉलीवुडचा तगडा कलाकार जॉन अॅब्राहिम व अभिनेत्री श्रुती हसन देखील आहे. शरद केळकर या अभिनेत्याने बॉलीवुड व मराठी अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. यापूर्वी शरद लय भारी, उत्तरायण या मराठी चित्रपटात तर हलचल, गोलिंयो की रासलीला-रामलीला, हिरो या बॉलीवुड चित्रपटात झळकला आहे. पण सध्या शरद केळकरचा गोपीनाथ मुंडे यांची भूमिका असणारा चित्रपट संघर्षयात्रा काही वादग्रस्त कारणांमुळे या चित्रपटाचे प्रदर्शित होण्याची तारीख लांबणीवर पडली आहे.