शंकर महादेवन म्हणतायत, माय कंट्री...माय म्युझिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 18:10 IST2017-01-05T18:10:06+5:302017-01-05T18:10:06+5:30
प्रतिभावंत आणि यशस्वी संगीतकारांपैकी गणना होणाऱ्या शंकर महादेवन यांनी नवीन तरीसुध्दा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या माय कंट्री माय म्युझिक नावाचा ...

शंकर महादेवन म्हणतायत, माय कंट्री...माय म्युझिक
प रतिभावंत आणि यशस्वी संगीतकारांपैकी गणना होणाऱ्या शंकर महादेवन यांनी नवीन तरीसुध्दा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या माय कंट्री माय म्युझिक नावाचा उपक्रम सुरु केला आहे; संगीत रसिकांसाठी लोकसंगीत उद्योगातील अनेक दिग्गजांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम म्हणजे एक संगीतमय प्रवास असून त्यात भारताच्या सांगितीक वारश्याला आंतर्भूत करण्यात आले आहे. रसिकांसाठी हृदयाचा ठाव घेणाऱ्या प्रादेशिक प्रभावांना एकत्र आणण्यामार्फत त्यांनी अतिशय सुंदर आविष्काराची निर्मिती केली आहे. भारतीय लोकसंगीताला मोठ्या क्षितीजावर नेऊन जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यामार्फत माय कंट्री माय म्युझिक नक्कीच हजारो हृदयांमध्ये जागा घेणार आहे आणि या संगीताला आजमितीपर्यंतचे सर्वात विश्वासार्ह संगीत म्हणून ख्याती मिळवून देणार आहे. पुण्यातील एनएच ७, विकएंडर शोला मिळालेल्या उदंड प्रतिसादाने आनंदित झालेले महादेवन म्हणाले,”आजच्या काळामध्ये तरुण श्रोतेवर्ग सर्वात मोठ्या प्रमाणात आढळतो. आपण त्यांच्यासोबत जुळून कशाप्रकारे काहीतरी वेगळे आणि कलात्मक दृष्ट्या भारतीय मुळाचा आनंद देऊ शकतो ही माझी संकल्पना होती. या उद्देशाने माय कंट्री माय म्युझिकचा उदय झाला ज्यामध्ये लोकसंगीताच्या सुंदर नमुन्यांना एकत्रित करुन आधुनिक तरीसुध्दा सांस्कृतिक दृष्ट्या समृध्द कलाकृतीचे प्रेक्षकांसाठी सादरीकरण करण्यात आले. एनएच७ विकएंडरमध्ये या वर्षी आम्हाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्हाला अतिशय आनंद झाला आहे आणि तरुणाईपर्यंत पोहोचण्यासाठी या महोत्सवाला आम्ही आमच्यासाठी महत्वाचा टप्पा समजत आहोत कारण यामार्फत सर्वप्रकारच्या भाषांचे अडथळे, संगीत शैली, जाती, वंश, धर्म या सर्व बंधनांना तोडले जाते. आम्हाला मोठी प्रेरणा मिळाली असून आम्ही येत्या प्रोजेक्ट्सची देखील तयारी करीत आहोत.”