शनिशिंगणापूर पुन्हा चर्चेत येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 12:34 IST2016-06-21T07:04:29+5:302016-06-21T12:34:29+5:30

चौथºयावर महिलांना प्रवेश न देण्यावरून शनी शिंगणापूर देवस्थान चर्चेत आलं होतं. तसेच ही चर्चा देशभर रंगली होती. आता हाच ...

Shanishinganapur will come back to the discussion | शनिशिंगणापूर पुन्हा चर्चेत येणार

शनिशिंगणापूर पुन्हा चर्चेत येणार

थºयावर महिलांना प्रवेश न देण्यावरून शनी शिंगणापूर देवस्थान चर्चेत आलं होतं. तसेच ही चर्चा देशभर रंगली होती. आता हाच मुद्दा पुन्हा चर्चेत येणार आहे. कारण 'चौर्य' नावाच्या चित्रपटाची कथा शनी शिंगणापूरवरून प्रेरित असून, ५ आॅगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जागृत देवस्थान असल्यानं या गावात चोरी होत नाही. चोरी करणाºयांना देव शिक्षा करतो, अशी गावातल्या रहिवाशांची धारणा असते. त्यामुळे गावातल्या घरांना दरवाजे नसतात. परंतु एकाएकी या देवळातच चोरी होते आणि लोकांच्या श्रद्धेला तडा पोहोचतो. अशा सस्पेन्स थ्रिलरची अनोखी सांगड या चित्रपटात पहायला मिळणार आहे. तसेच किशोर कदम, गणेश यादव, मिलिंद शिंदे, प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास,दिनेश लता शेट्टी, तीर्था मुरबाडकर आणि श्रुती कुलकर्णी या आदीं कलाकारांचा या चित्रपटात  समावेश आहे. नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईनच्या नीलेश नवलखा, विवेक कजारिया आणि सिनेलीला टॉकीजच्या अश्विनी पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

Web Title: Shanishinganapur will come back to the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.