शाहरुखसोबतचा फोटो शेअर करून ट्रोल झाली जब्याची शालू, नेटकरी म्हणाले -"आमचं जब्या आता तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 10:04 IST2025-07-08T10:04:14+5:302025-07-08T10:04:43+5:30
Rajeshwari Kharat: 'फॅण्ड्री' सिनेमातून घराघरात पोहचलेली शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात सातत्याने चर्चेत येत असते.

शाहरुखसोबतचा फोटो शेअर करून ट्रोल झाली जब्याची शालू, नेटकरी म्हणाले -"आमचं जब्या आता तर..."
'फॅण्ड्री' (Fandry Movie) सिनेमातून घराघरात पोहचलेली शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) सातत्याने चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असून कधी कधी तिला पोस्टमुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. दरम्यान आता तिने इंस्टाग्रामवर शाहरुख खान(Shah Rukh Khan)सोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने इंस्टाग्रामवर शाहरुख खानसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट असून तिने या फोटोसोबत शाहरूख खानला टॅग केलं आहे. हा फोटो पाहून चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला तर काहींनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. तिने स्नॅपचॅट, एआयचा वापर केल्याचं ते बोलत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एका युजरने लिहिले की, थोडं एडिटिंग लपून ठेवायला नाही जमली का.. आमचं जब्या आता तर खरं चं मरतंय. हीच गुड न्यूज द्यायची होती का तुला.. दुसऱ्याने लिहिले, स्नॅपचॅटवाला फिल्टर, आणखी एकाने लिहिले की, फिल्टर छान आहे बरं. एकाने लिहिले की, शालू जरा जास्तच झालं.. पण असू दे.. यापेक्षा भयंकर गोष्टी मराठी अभिनेत्याच्या मी पाहिल्या आहेत. दुसऱ्याने म्हटलं, शालू तू धर्म बदलला आहेस आमचा मेंदू नाही. आम्हाला कळतं.
वर्कफ्रंट
'फॅण्ड्री' चित्रपटातून राजेश्वरी खरातने मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केले. यात तिने साकारलेली शालू रसिकांना खूपच भावली. आजही लोक तिला शालू म्हणून ओळखतात. राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडे पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. ते दोघे या चित्रपटात पती पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.