छाया कदम यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 17:24 IST2016-06-19T11:54:10+5:302016-06-19T17:24:10+5:30

नवी दिल्ली येथे नुकत्याच  झालेल्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री छाया कदम यांना भिडू या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा ...

Shadowa Kadam Best Supporting Actress Award | छाया कदम यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री पुरस्कार

छाया कदम यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री पुरस्कार

ी दिल्ली येथे नुकत्याच  झालेल्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री छाया कदम यांना भिडू या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मिलिंद शिंदे दिग्दर्शित भिडू हा चित्रपट आहे. त्यांच्या या यशासाठी त्यांचे मोठया प्रमाणवर सोशलमिडीयावर कौतुक होत असल्याचे दिसत आहे. छाया कदम यांनी सैराट या चित्रपटात अक्काच्या भूमिकेत आर्ची आणि परश्या यांचा संसार फुलविण्यासाठी मदत केली होती. तर फॅन्ड्री या चित्रपटादेखील त्या झळकल्या होत्या. त्यांच्या या यशाचे खरचं कौतुक व अभिमानदेखील वाटत आहे. आज या पुरस्काराने त्यांनी पुन्हा सिद्ध केले आहे की, बारावी नापास असल्या तरी, आपल्या आवडत्या क्षेत्रात उंचावर पोहोचले आहे. अभ्यासच जीवनात सर्व काही नसते. त्यामुळे जीवनाचा आनंद लुटा. अपयशाने खचून जावू नका. असा संदेशच जणू काही त्यांनी पुन्हा तरूणांना आपल्या या यशाच्या माध्यमातून दिला आहे. 

Web Title: Shadowa Kadam Best Supporting Actress Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.