सोशल मीडियावर सैराटचं झिंगाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 16:40 IST2016-04-27T11:10:45+5:302016-04-27T16:40:45+5:30

सैराट’ चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांचा सोशल मीडियावर झिंगाट सुरू झाला आहे. ‘झिंगाट’ गाण्याने तर तरुणाईला वेड लागवलंय, पण ट्रेलरमध्ये ...

Serrat Zangat on social media | सोशल मीडियावर सैराटचं झिंगाट

सोशल मीडियावर सैराटचं झिंगाट

राट’ चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांचा सोशल मीडियावर झिंगाट सुरू झाला आहे. ‘झिंगाट’ गाण्याने तर तरुणाईला वेड लागवलंय, पण ट्रेलरमध्ये दिसत असलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत प्रचंड उत्सुकता आहे. त्याची उत्तरेही सोशल मीडियावरील चर्चेत दिसत आहेत. 
सोशल मीडियात ‘सैराट’बाबत चर्चा 
* ‘सैराट’च्या या शब्दाच्या अर्थाबाबत उत्सुकता आहे.  सैराट हा अस्सल मराठी शब्द आहे, तुकारामांनीही त्यांच्या अभंगात अनेकदा सैराट शब्द वापरला आहे.  सैराटम्हणजे सुसाट, वेगवान.
* सैराटचे शुटींग सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील नागराजच्या गावी या सिनेमाचं शुटिंग करण्यात आलंय. गाण्यात दिसणारी विहीर देखील करमळा तालुक्यातील आहे. सिनेमातील अधिकाधिक भाग हा नागराजच्या गावातील आहे.नागराजने बालपणीतला घालवलेल्या बराच जागा या सिनेमात वापरण्यात आल्या आहेत.
* ३) सैराट सिनेमातील अभिनेता अकाश ठोसर (पर्शा) हा पेहलवान होता. त्याने या सिनेमासाठी जवळ जवळ ८ ते ९ किलो वजन कमी केलं आहे. नागराजला आकाश एका रेल्वे स्टेशनवर दिसला. तेथे त्याने सैराटच्या हिरोसाठी त्याची निवड केली. शुटिंगनंतर पहिल्यांदा आपल्याला रूपेरी पडद्यावर पाहून आकाश खूप भावूक झाला होता. आकाश  शूटींग संपेपर्यंत नागराजच्याच घरी राहायचा. नागराजने कायम आपल्या सिनेमातील कलाकारांसोबत खेळीमेळीचं वातावरण ठेवतो.
*  पर्शा हा सिनेमात गरिब कुटुंबातील आहे. आणि हे नाटकीवाटू नये यासाठी त्यांनी त्या घराची भिंतपाडली आहे.
*  नागराज मंजुळेच्या सिनेमातील प्रत्येक माणूस खरा वाटतो. कारण नागराजची आवड खूप खरी असते. सैराटमध्ये देखील नागराजने त्याच्या गावातील आणि गावाजवळची माणसं घेतली आहेत.
*  नागराज मंजुळे आपल्या सिनेमात किंवा शॉर्ट फिल्ममध्ये प्रत्येकवेळी नवीन कॅरेक्टर घेऊन येतो. आणि त्या प्रत्येकाला तो एक वेगळं स्थान मिळवण्यास खासप्रयत्न करतो. पिस्तुल्यामधून त्याने त्या लहान मुलाला ओळख निर्माण करून दिली. त्यानंतर त्यांनी फँड्रीमधील जब्याला आणि आता सैराटमधून पर्शा आणि आचीर्ला ते स्थान मिळवून देण्यास सुरूवात झाली आहे.
*  सैराटची अभिनेत्री रिंकू राजगुरूला (चित्रपटातली आर्ची) बुलेट शिकून घ्यावी लागली. रिंकू एका गाण्यात ट्रॅक्टर चालवतानाही दिसणार आहे.  ती अगदी स्टाँग हवी होती . नागराजने रिंकुमध्ये त्याच्या आई, आत्या, ताई आणि आजीचे गुण टाकले आहेत
* सैराटं झालं जी हे गाणं दक्षिणेतल्या गायिका चिन्मयी श्रीपदा यांनी गायलं आहे. चिन्मयी यांनी संगीतक्षेत्रात ए.आर रहमान यांच्यासोबत काम केलं आहे. चिन्मयी यांनी हे मराठी गाणं गायलं आहे. त्‘आताच बया का बावरलं’ हे गाणं गायिका श्रेया घोषाल यांनी गायलं आहे.

Web Title: Serrat Zangat on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.