​‘कोती’ चित्रपटाची ‘कान’ चित्रपट महोत्सवात निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 19:40 IST2016-04-06T02:38:22+5:302016-04-05T19:40:12+5:30

मराठी चित्रपटांचा आता जगभर मान्यवर चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून प्रवास सुरू झालेला आहे. त्यात सुहास भोसले दिग्दर्शित ‘कोती’ या चित्रपटाची ...

Selection of 'Kothi' movie 'Cannes' Film Festival | ​‘कोती’ चित्रपटाची ‘कान’ चित्रपट महोत्सवात निवड

​‘कोती’ चित्रपटाची ‘कान’ चित्रपट महोत्सवात निवड

ाठी चित्रपटांचा आता जगभर मान्यवर चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून प्रवास सुरू झालेला आहे. त्यात सुहास भोसले दिग्दर्शित ‘कोती’ या चित्रपटाची ‘कान’ चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. या चित्रपटाची निवड संस्कृती कलादर्पण चित्रपट स्पर्धेमध्येसुद्धा झाली आहे. 

हा चित्रपट तृतीयपंथियांना त्यांच्या समस्या लहानपणापासून कशा जाणवतात, शारीरिक व मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या समस्यांना त्यांना कसे सामोरे जावे लागते, या आशयाभोवती आधारित आहे. 

या चित्रपटासाठी संदीप गिरी, लक्ष्मी त्रिपाठी या सारख्यांचीही विशेष मदत झाली. या चित्रपटाची भारतीय पॅनोरमासाठी २०१५ मध्येच निवड झाली होती. आता राष्ट्रीय व राज्य पुरस्कारांच्या घोषणेनंतर ‘कोती’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Selection of 'Kothi' movie 'Cannes' Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.