​ पहा कुठे फिरतेय सई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 12:15 IST2016-12-05T12:15:29+5:302016-12-05T12:15:29+5:30

      priyanka londhe    अभिनेत्री सई ताम्हणकरचा वजनदार हा चित्रपट नूकताच बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरला आहे. वजनदारच्या ...

See where are you hanging? | ​ पहा कुठे फिरतेय सई?

​ पहा कुठे फिरतेय सई?

 
  priyanka londhe 
 

अभिनेत्री सई ताम्हणकरचा वजनदार हा चित्रपट नूकताच बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरला आहे. वजनदारच्या प्रमोशसाठी मध्यंतरी सगळीकडे दिसणारी सई ताम्हणकर अचानक कुठे गायब झाली असा प्रश्न नक्कीच तिच्या चाहत्यांना पडला असणार. वजनदार नंतर सई कुठे गेली हे आम्ही तुम्हाला सांगतोय. नुकतीच सईने एक झक्कास ट्रीप केली आहे. उत्तरांचलच्या निसर्गरम्य वातावरणात सईने चांगलीच धमाल केली आहे. काही स्पेशल फ्रेन्ड्ससोबत सई उत्तरांचल मधील, सोनापानी आणि बरेली या ठिकाणांना भेट देऊन आली आहे.


हिमालयाच्या कुशीत रिलॅक्स होण्यासाठी तिने ही ट्रीप केली असल्याचे समजतेय. उत्तरांचलच्या या हॉलिडे संदर्भात सईने लोकमत सीएनएक्सशी गप्पा मारुन अनेक गोष्टी शेअर केल्या. सई सांगते, काही दिवसांपूर्वी चित्रपटांचे शूटिंग आणि प्रमोशन या गोष्टींमुळे मला खरच फार थकवा आला होता. स्वत:ला रिफ्रेश करण्यासाठी मग मी काही फ्रेन्ड्स सोबत उत्तरांचलला गेले. ही ट्रीप माझ्यासाठी खुपच मेमोरेबल होती. हिमालयाच्या त्या सुंदर वातावरणात जाऊन तिथल्या निसर्गाला भेट देऊन फारच छान वाटले. मला हिमालयाविषयी सुरुवाती पासूनच खुप आकर्षण आहे. हिमालय पाहिल्यावर मला खरच काहीतरी होत. कधी रडू येत तर कधी फारच शांत वाटतं. हिमालयासारख कोणीतरी आपल्या आयुष्यात असावं असं मला नेहमीच वाटतं. सोनापानी आणि बरेली ही दोन्ही ठिकाणे फार सुंदर आहेत. बरेलीमध्ये तर आम्हाला अनु नावाच्या एका महिलेने मस्त ७-८ प्रकारच्या डिश करुन खायला घातल्या. त्या पदार्थांची चव तर अप्रतिमच होती. या ट्रीपमध्ये मी स्वत:साठी वेळ दिला, स्वयंपाक केला आणि पुस्तकही वाचले. क्या बात है सई, या उत्तरांचल ट्रीप मध्ये तु चांगलीच धमाल केली आहेस.

Web Title: See where are you hanging?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.