पाहा, मराठीमधील थ्रिलर वेब सिरीज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2017 06:18 AM2017-01-27T06:18:59+5:302017-01-27T11:48:59+5:30

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत वेबसीरीजची चलती असल्याचे पाहायला मिळत आहे, अशाच अनेक वेबसीरीजमध्ये आणखी वेबसीरीज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. द डायरी आॅफ अ सायको असे या वेबसीरीजचे नाव आहे. भारतातील पहिलीच फाऊंड फुटेजवर आधारीत थ्रिलर अशी ही वेबसीरीज आहे.

See, thriller web series in Marathi | पाहा, मराठीमधील थ्रिलर वेब सिरीज

पाहा, मराठीमधील थ्रिलर वेब सिरीज

googlenewsNext
्या मराठी चित्रपटसृष्टीत वेबसीरीजची चलती असल्याचे पाहायला मिळत आहे, एकापाठोपाठ एक वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटिला येत आहे. स्ट्रगलर साला, कास्टिंग काऊच विथ निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ, आपल्या बापाचा रस्ता अशा अनेक वेबसीरीज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तसेच वेबसीरीजची चर्चा पाहता, आता  कास्टिंग काऊच विथ निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ सीझन दुसरादेखील प्रेक्षकांच्या भेटिला आला आहे.

      एवढेच नाही तर या वेबसीरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतानादेखील दिसत आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांनादेखील या वेबसीरीजचा मोह आवरला नाही. बरेच मराठी कलाकार आपल्या अभिनयाची चुणूक वेबसीरीजमध्ये दाखविताना दिसत आहे. अशाच अनेक वेबसीरीजमध्ये आणखी वेबसीरीज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

        द डायरी आॅफ अ सायको असे या वेबसीरीजचे नाव आहे. भारतातील पहिलीच फाऊंड फुटेजवर आधारीत  थ्रिलर अशी ही वेबसीरीज आहे. या वेबसीरीजचा पहिला एपिसोड नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यापूर्वी फाऊंड फुटेजवर आधारीत हॉलीवूड चित्रपट पॅरानॉमल अ‍ॅक्टिव्हिटी आणि हिंदीत रागिनी एमएमएस या चित्रपटांना यश मिळाले आहे.  मराठीत फाऊंड फुटेजवर आधारीत हा पहिलाच प्रयत्न आहे. हा प्रयत्न पहिल्याच एपिसोडमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असल्याचे पाहायला मिळत आहे. या वेबसीरीजमध्ये सर्व नवोदित कलाकारांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच या वेब सिरीजचे टिझर आणि ट्रेलर युट्युबवर प्रदर्शित करण्यात आले असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे पाहायला मिळत आहे. चला तर मग या थ्रीलर वेबसीरीजच्या दुसºया एपिसोडची थोडी वाट पाहूयात. 

Web Title: See, thriller web series in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.