SEE PHOTO:अभिनेत्री मयुरी वाघच्या लग्नाचे आतले खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 18:03 IST2017-02-04T12:27:27+5:302017-02-04T18:03:11+5:30

मराठीत सध्या आया मौसम शादी का असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या काही महिन्यांत मराठीत अनेक कलाकार लग्नाच्या ...

SEE PHOTO: Special photo of actress Meuri Wagh's wedding | SEE PHOTO:अभिनेत्री मयुरी वाघच्या लग्नाचे आतले खास फोटो

SEE PHOTO:अभिनेत्री मयुरी वाघच्या लग्नाचे आतले खास फोटो

ाठीत सध्या आया मौसम शादी का असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या काही महिन्यांत मराठीत अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले आहे. संग्राम समेळ-पल्लवी पाटील, मृण्मयी देशपांडे-स्वप्नील, श्रुती मराठे-गौरव घाटणेकर, चिराग पाटील-सना अशा मराठीतील कलाकार विवाहबंधनात अडकले आहेत. याच यादीत आणखी एका मराठी जोडीचं नाव जोडलं गेलं आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून छोट्या पडद्यावरील अस्मिता या मालिकेतून रसिकांची लाडकी ठरलेली अभिनेत्री मयूरी वाघ रेशीमगाठीत अडकली आहे. अस्मिता याच मालिकेतील तिचा जोडीदार तिच्या आयुष्याचा रियल जोडीदार बनला आहे. हा जोडीदार म्हणजे या मालिकेत अस्मिताचा जोडीदार दाखवलेला अभि म्हणजेच अभिनेता पियूष रानडेसह मयूरीचा लग्नसोहळा पार पडला आहे.



बडोद्यात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी मयूरी आणि पियूषचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत हा शानदार विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर मयूरी आणि पियूषने शानदार फोटोसेशनसुद्धा केले. यावेळी या नवदाम्पत्याच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता.



सिनेमा, नाटक आणि मालिकांमध्ये काम करता करता कलाकारांची ओळख होऊन ते आयुष्याचे जोडीदार बनल्याची अनेक उदाहरणं आहेत. यांत मयूरी आणि पियूषची भर पडली आहे. अस्मिता या मालिकेत काम करता करता मयूरी आणि पियूषची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर आधी मैत्रीत झालं. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या वर्षी आपल्या नात्याला जन्मोजन्मीच्या बंधनात बदलण्याचा निर्णय या दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. त्यानंतर गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर दोघांचा साखरपुडा पार पडला होता. आता दोघंही लग्नाच्या बंधनात अडकले असून या नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही तर इतकेच सांगू नांदा सौख्य भरे !
 

Web Title: SEE PHOTO: Special photo of actress Meuri Wagh's wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.