पाहा कसा दिसायचा रितेश लहानपणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2016 14:01 IST2016-12-18T14:01:50+5:302016-12-18T14:01:50+5:30
आपल्या आवडत्या कलाकारंच्या सर्वच गोष्टी जाणुन घेण्यात प्रेक्षकांना रस असतो. आपल्याला आवडणाºया कालाकारंच्या आयुष्यात काय चालले आहे हे जाणुन ...
.jpg)
पाहा कसा दिसायचा रितेश लहानपणी
आ ल्या आवडत्या कलाकारंच्या सर्वच गोष्टी जाणुन घेण्यात प्रेक्षकांना रस असतो. आपल्याला आवडणाºया कालाकारंच्या आयुष्यात काय चालले आहे हे जाणुन घेण्याची उत्सुकता देखील प्रत्येकालाच असते. जर आपल्या लाडक्या कलाकारांचे लहानपणीचे फोटो पाहायला मिळाले तर नक्कीच आनंद होतो ना. बॉलिवूड आणि मराठीतील हॅण्डसम अभिनेता म्हणून ओळखला जाणारा रितेश देशमुखचा नुकताच वाढदिवस झाला असून त्याने वयाची ३८ वर्षे पूर्ण केली आहेत. बॉलिवूडप्रमाणेच मराठीतही रितेशने 'लय भारी' एन्ट्री घेत मोठ्या पडद्यावरचा आपला दबदबा कायम ठेवला आहे. वयाची पस्तीशी ओलांडल्यानंतरसुद्धा रितेश वीशीतल्या तरुणासारखाच दिसतोय. वाढत्या वयाच्या त्याच्यावर मुळीच परिणाम झालेला दिसत नाही. त्याने स्वत:ला अगदी फिट ठेवले आहे. रितेश आता जेवढा हॅण्डसम दिसतो, तितकाच बालपणी क्यूट दिसायचा. वरील छायाचित्रात तुम्ही रितेशचे आता आणि बालपणीचे रुप पाहू शकता. त्याचे बालपणीचे रुप बघून आमच्याप्रमाणेच तुमच्याही तोंडून 'क्यूट' हा शब्द नक्की बाहेर पडेल. रितेश दोन गोंडस मुलांचा बाबा असून विआन आणि राहिल ही त्याच्या चिमुकल्यांची नावे आहेत. या क्युट रितेशचा हा सुंदर हा फोटो सध़्या सोशल साईट्सवर व्हायरल होत आहे. रितेशचे अनेक चाहते हा फोटो लाईक देखील करीत आहेत.