पाहा सुबोधचे इन्स्टावर किती फॉलोवर्स ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 17:42 IST2016-12-15T17:42:58+5:302016-12-15T17:42:58+5:30
आजकाल सोशलमीडीयावर कोणाला किती लाईक्स मिळतात आणि किती फॉलोअर्स आहेत, यावरुनच समोरच्या व्यक्तीचे स्टेटस ठरविले जात आहे. एखादा फोटो ...

पाहा सुबोधचे इन्स्टावर किती फॉलोवर्स ?
आ काल सोशलमीडीयावर कोणाला किती लाईक्स मिळतात आणि किती फॉलोअर्स आहेत, यावरुनच समोरच्या व्यक्तीचे स्टेटस ठरविले जात आहे. एखादा फोटो अपलोड केल्यावर जर हजारो लाईक्स आल्या तरच तुम्ही सोशल साईट्सवर हिट आहात असे समजले जाते. कलाकारांचे मात्र आजकाल हजारो-लाखो फॉलोअर्स सोशल साईट्सवर असल्याचे दिसते. आता हेच पाहा ना, अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करुन रसिक प्रेक्षकांच्या मनावर मोहर उमटविणारा अभिनेता सुबोध भावेचे देखील सोशलमीडियावर असेच चाहते आहेत. नुकतेच सुबोधचे इन्स्टाग्रामवर १ लाख फॉलोवर्स झाल्याचे समजले आहे. सुबोधचा फुगे हा चित्रपट प्रदर्शनासाठी आता सज्ज झाला आहे. सहज सुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलेल्या सुबोधने आता सोशलमिडियावर देखील नेटिझन्सना भूरळ पाडून यंगिस्तानमध्ये तो सुपरहिट झाल्याचे दिसून येत आहे. नेहमी सोशल साईट्सवर अपडेटेड राहून त्याने चाहत्यांचे हे प्रेम मिळवलेले आहे. कलाकारांना आता चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशलमीडिया हा एक चांगला पर्याय मिळाला आहे. प्रत्येक गोष्ट लगेचच एका क्लिकवर हे सेलिब्रिटीज आपल्या फॅन्स पर्यंत पोहचवाया तयार असतात. मग एखादया चित्रपटाचे चित्रीकरण असो किंवा एखादी महत्वाची बाब असो चाहत्यांना सर्वच गोष्टी इंटरनेटवर समजतात. आता या रेस मध्ये सुबोध भावे देखील सामील झाला आहे. इन्स्टावरील त्याच्या फॉलोवर्समुळे सुबोध सध्या चांगलाच हॅपी असल्याचे दिसतेय. सुबोधच्या चाहत्यांमध्ये अशीच दिवसेंदिवस वाढ व्हावी आणि सुबोधचे अपडेट्स आपल्याला कायमच सोशल साईट्सवर मिळावेत अशी आपण आशा करुयात.