पाहा....आकाश ठोसर एफयू या चित्रपटाच्या गाण्यावर ठुमके लावताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 13:29 IST2017-02-06T07:59:26+5:302017-02-06T13:29:26+5:30
आकाश ठोसर एफयू या चित्रपटाच्या गाण्यावर ठुमके लावताना पाहायला मिळणार आहे
.jpg)
पाहा....आकाश ठोसर एफयू या चित्रपटाच्या गाण्यावर ठुमके लावताना
स राट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. या चित्रपटातील आर्ची आणि परश्याच्या जोडीने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. या जोडीची चर्चा लहानांपासून ते मोठयांपर्यत होत असते. आज ही या चित्रपटाचा विषय तितकाच नाविन्यपूर्ण आहे. असे या चित्रपटाचे यश पाहता, या चित्रपटातील कलाकारांचेदेखील नशीबच उजळले. रिकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे दोन्ही कलाकार एका रात्रीत मराठी चित्रपटसृष्टीचे हिरोच बनले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. या चित्रपटाच्या यशानंतर आर्ची आणि परश्याला लॉटरीच लागली.
आता हेच पाहा ना, परश्या म्हणजेच आकाश ठोसर हा मराठी चित्रपटसृष्टीचे दिग्गज दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एफयू असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाची चर्चा कित्येक दिवसांपासून रंगत आहे. यामुळे या चित्रपटातील परश्याची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक होते. आता मात्र प्रेक्षकांची ही उत्सुकता संपली आहे. कारण नुकतेच या चित्रपटातील टायटल सॉन्गचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. या गाण्याचा व्हिडीओ सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील टायटल सॉग्नवर आकाश थिरकताना दिसत आहे. आकाशच्या या डान्सला प्रचंड प्रमाणात पसंती मिळत आहे. आकाशचा हा डान्स पाहता, त्याचे चाहते पुन्हा त्याच्या प्रेमात पडेल हे नक्की.
आकाशच्या या आगामी चित्रपटात त्याच्यासोबत सत्या मांजरेकर, संस्कृती बालगुडे, माधुरी देसाई पाहायला मिळणार आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक तरूण कलाकारदेखील या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये माधव देवचक्के, मयुरेश पेम, मधुरा देशपांडे अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. त्यामुळे साहजिकच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार यांची औत्सुक्य प्रेक्षकांना लागले आहे.