'शाळा' फेम सुजय डहाकेने केली नव्या चित्रपटाची घोषणा, ही आहे चित्रपटाची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 06:37 PM2021-08-16T18:37:42+5:302021-08-16T18:38:06+5:30

'शाळा', 'फुंतरू', 'आजोबा', 'केसरी' असे एका पेक्षा एक दमदार चित्रपट बनवणारा दिग्दर्शक सुजय डहाके पुन्हा एकदा एका नव्या आव्हानासह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'School' fame Sujay Dahake has announced a new film, this is the specialty of the film | 'शाळा' फेम सुजय डहाकेने केली नव्या चित्रपटाची घोषणा, ही आहे चित्रपटाची खासियत

'शाळा' फेम सुजय डहाकेने केली नव्या चित्रपटाची घोषणा, ही आहे चित्रपटाची खासियत

googlenewsNext

'शाळा', 'फुंतरू', 'आजोबा', 'केसरी' असे एका पेक्षा एक दमदार चित्रपट बनवणारा दिग्दर्शक सुजय डहाके पुन्हा एकदा एका नव्या आव्हानासह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुजयने १५ ऑगस्ट रोजी पोस्टर रिलीजच्या माध्यमातून आपल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. सुजयने 'श्यामची आई' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.

अमृता अरूण राव यांची निर्मिती असलेला 'श्यामची आई' हा चित्रपट पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजींच्या मूळ कादंबरीवर आधारित असेल. यंदाचे वर्ष भारतीय सिनेसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या १५०व्या जयंतीचे आहे. याच पुण्य पर्वाचे औचित्य साधून 'श्यामची आई' हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय सुजयने घेतला आहे.

या चित्रपटाची बरीच वैशिष्ट्ये असतील. यातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट असेल. या चित्रपटात ब्रिटिश राजवटीतील १९१२ ते १९४७ पर्यंतचा काळ पहायला मिळणार आहे. या चित्रपटाबाबतची माहिती सध्या तरी गुपित ठेवण्यात आलेली आहे. तूर्तास केवळ 'श्यामची आई' या चित्रपटाची घोषणा करण्यात आल्याचे सुजयने जाहिर केले आहे.


'श्यामची आई' हा चित्रपट पुढल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज करण्याची योजना आखण्यात आली आहे. अद्याप या चित्रपटातील कलाकारांची निवड करण्यात आलेली नसून, ऑडीशनच्या माध्यमातून सर्व कलाकारांची निवड केली जाणार आहे. या चित्रपटाचा जुन्या 'श्यामची आई' या चित्रपटाशी काहीही संबंध नाही. हा चित्रपट साने गुरुजींच्या कादंबरीवर आधारीत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कादंबरीतील बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत, ज्या आचार्य अत्रेंच्या 'श्यामची आई' चित्रपटात करण्यात आल्या नव्हत्या.

'शाळा' या पहिल्या चित्रपटापासून सुजयच्या मनात 'श्यामची आई' हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट बनवण्याचा विचार घोळत होता. इतर चित्रपटांसाठी काम करताना दुसरीकडे सुजयचा या चित्रपटावर रिसर्चही सुरू होता. यासाठी आपण पाच-सहा वर्षे मेहनत घेतली असून, 'श्यामची आई' बनवण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असल्याचे सुजयचे म्हणणे आहे. या चित्रपटाचं शूटिंग ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करून प्रेक्षकांना १९ व्या शतकात नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Web Title: 'School' fame Sujay Dahake has announced a new film, this is the specialty of the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.