सावनी रविंद्र गाणार बॉलिवुडमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 17:38 IST2017-02-19T12:08:11+5:302017-02-19T17:38:11+5:30
आपल्या सुरेख आवाजाने गायिका सावनी रविंद्र हिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीत एक से एक गाणी गायिली ...

सावनी रविंद्र गाणार बॉलिवुडमध्ये
पल्या सुरेख आवाजाने गायिका सावनी रविंद्र हिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीत एक से एक गाणी गायिली आहेत. तिच्या प्रत्येक गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. आता, प्रेक्षकांची ही लाडकी गायिका सावनी रविंद्र बॉलिवुडमध्ये गाणार असल्याचे समजत आहे. तिचे हे बॉलिवुडमधील पहिलेच गाणे असणार आहे. तिने हे गाणे मोहम्मद इरफानसोबत गायिले आहे. तिचे हे बॉलिवुड साँग रोमँण्टिक आहे. जसे की, प्रत्येक कलाकाराला पहिला चित्रपट, गाणे, सहकलाकार याविषयी अधिक प्रेम असतं. कारण आपल्या यशस्वी करिअरची सुरूवातच त्या गोष्टींपासून झालेली असते. असाच काहीसा आनंद मराठी चित्रपटसृष्ट्रीची गायिका सावनी रविंद्र हिला बॉलिवुडमध्ये संधी मिळाल्याने झाला आहे. तिने हे गाणे कोणत्या बॉलिवुड चित्रपटासाठी गायिले आहे हे अदयापदेखील कळाले नाही. यासाठी तिच्या चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.
सावनीने तामिळ इंडस्ट्रीमध्ये खूप गाणी गायली आहेत. नुकतेच तिचे वेन्निलविन सालईगलिल हे गाणे प्रदर्शित झाले आहे. तिच्या या गाण्याला सोशलमीडियावर प्रचंड प्रमाणात लाइक्स मिळताना दिसत आहे. यापूर्वी गायिका सावनी रवींद्रने अनेक मराठी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. सावनीने तिच्या सदाबहार अवाजाने रसिक प्रेक्षकांना देखील नेहमीच मंत्रमुग्ध केले आहे. तसेच छोटया पडदयावरदेखील तिच्या आवाजाची जादू ऐकण्यास मिळाली. कारण तिने होणार सून मी हया घरची, कमला अशा अनेक मालिकांचे शीर्षकगीत सावनीने गायिली आहेत. तसेच नुकतेच तिने सावनी रवींद्र नावाचे एक नवे अॅपदेखील तिने चाहत्यांसाठी आणले आहेत. या अॅपच्या माध्यमातून सावनीचे सर्व गाणी तिच्या चाहत्यांना ऐकण्यास मिळत आहेत.