सौरभची पुणेरी पाटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 17:50 IST2016-10-26T17:50:03+5:302016-10-26T17:50:03+5:30

            पुणेरी पाट्या खरेतर सगळीकडेच चर्चेचा विषय असतात. पुण्यातील अनेक दुकानांवर किंवा रस्त्यांवरही तुम्हाला ...

Saurabh's Punei Pati | सौरभची पुणेरी पाटी

सौरभची पुणेरी पाटी

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> 
 
        पुणेरी पाट्या खरेतर सगळीकडेच चर्चेचा विषय असतात. पुण्यातील अनेक दुकानांवर किंवा रस्त्यांवरही तुम्हाला अगदी मजेशीर पाट्या पहायला मिळतील. अनेक चित्रपटात सुद्धा या पुणेरी पाट्यांविषयी जोक्स आपण ऐकतोच. नुकतेच अभिनेता सौरभ गोखलेने एक झक्कास पुणेरी पाटी तयार केली.  स्वत:ला आलेल्या अनुभवावरुन सौरभने ही पाटी तयार केला आहे. फेसबुकवर त्याने एक पोस्ट टाकली आहे. सौरभने लिहिलेय की, पुण्यात इच्छुक व्यक्तींना वधु-वर निश्चित मिळतील. परंतु गाडी पार्किंग ला जागा मिळणार नाही. आता सौरभला पुण्यात गाडी पार्क करायला जागा मिळाली नाही म्हणून त्याने खरेच वैतागून ही पुणेरी पाटी फेसबुकवर शेअर केली आहे. याविषयी सौरभने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले की, ''एफ.सी रोड  रोडवर माझी गाडी पार्क करण्यासाठी जागा शोधत होतो. तिथे नेहमीच तेवढी गर्दी असते की मला कधीच लवकर पार्किंगसाठी जागा मिळत नाही. आज पुन्हा एकदा  २० मिनिट मी पार्किंगसाठी जागा शोधत होतो. खूप वेळ पार्किगसाठी जागा शोधूनही मला शेवटी मला जागा मिळालीच नाही. मग मला नाईलाजास्तव दीड किलोमीटर दूर माझी गाडी पार्क करण्यासाठी जावे लागले. तिथून मला पुन्हा एफ.सी रोड ला चालत यावे लागले. यामध्ये माझा फारच वेळ गेला. आता पुण्यातही खरेच नशीबवान माणसालाच पार्किंगसाठी जागा मिळू शकते असे सौरभने मजेत सांगितले. मला नेहमीच असे काहीतरी मजेशीर सुचले की मी लगेच सोशल साईट्सवर शेअर करतो असेही सौरभने सांगितले. 

 

Web Title: Saurabh's Punei Pati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.