सौरभ गोखलेचा ड्रीम रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 13:33 IST2017-02-11T08:03:15+5:302017-02-11T13:33:15+5:30

प्रत्येक कलाकाराचा एक ड्रीम रोल असतो. हा ड्रीम रोल कधी करण्यास मिळणार याची वाट ते पाहत असतात. अनेक चित्रपट ...

Saurabh Gokhale's Dream Roll | सौरभ गोखलेचा ड्रीम रोल

सौरभ गोखलेचा ड्रीम रोल

रत्येक कलाकाराचा एक ड्रीम रोल असतो. हा ड्रीम रोल कधी करण्यास मिळणार याची वाट ते पाहत असतात. अनेक चित्रपट केले असेल तरी ड्रीम रोलच्या प्रतिक्षेत सर्वच कलाकार पाहायला मिळतात. आपल्याला ड्रीम रोल कधी करण्यास मिळणार याची संधी ते शोधत असतात. अशीच संधी अभिनेता सौरभ गोखले शोधताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या खलनायकाने नुकतीच आपली ही इच्छा सोशलमीडियावर व्यक्त केली आहे. सौरभला खलनायकाची भूमिका साकारण्याची इच्छा निर्माण झाली आहे. नुकताच खलनायक हा व्हिलन या गँगस्टर असावा असे त्याला वाटते. त्याच्या या पोस्टला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. तसेच तूला व्हिलनच्या भूमिकेत पाहायला नक्कीच आवडेल, तुला व्हिलनची भूमिका का करायची आहे याचा छडा नक्कीच लावेल अशा अनेक गंमतीशीर कमेंन्टदेखील पाहायला मिळत आहे. असो, मात्र सौरभची ही इच्छा लवकरच पूर्ण होवो अशी अपेक्षा आपण करूयात. 
           
          सौरभ नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याने नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा निर्माण केली आहे. तसेच तो राधा ही बावरी या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रियदेखील झाला होता. त्याचबरोबर मांडला दोन घडीचा डाव, उंच माझा झोका, एक मोहोर अबोल, श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी अशा अनेक मालिकादेखील त्याने केल्या आहेत. योद्धा, पेज फोर या चित्रपटाच्या माध्यमातूनदेखील त्याने अभिनयाची चुणूक दाखविली आहे. तसेच सध्या तो छडा या नाटकाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत आहे. 


Web Title: Saurabh Gokhale's Dream Roll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.