सैराट फेम रिंकू राजगुरूने वाजवली कोणाच्या कानाखाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2017 01:35 PM2017-03-24T13:35:43+5:302017-03-24T19:05:43+5:30

'सैराट' चित्रपटाचा कन्नड भाषेतील रिमेक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 'मनसू मल्लिगे' या नावाने हा चित्रपट बनवण्यात आला आहे. ...

Sarkat fame Rinku Rajguru played under whose ears? | सैराट फेम रिंकू राजगुरूने वाजवली कोणाच्या कानाखाली?

सैराट फेम रिंकू राजगुरूने वाजवली कोणाच्या कानाखाली?

googlenewsNext
'
;सैराट' चित्रपटाचा कन्नड भाषेतील रिमेक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 'मनसू मल्लिगे' या नावाने हा चित्रपट बनवण्यात आला आहे. 'सैराट'ला मिळालेल्या अफाट यशानंतर हा चित्रपट तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या चार दाक्षिणात्य आणि हिंदी भाषेतही बनणार आहे. कन्नड चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून त्याचा ट्रेलर आणि गाणी प्रचंड गाजत आहेत.
याही चित्रपटात रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ती या चित्रपटात आर्ची नव्हे तर संजू ही व्यक्तिरेखा साकारत आहे. आईवडिलांच्या प्रेमात वाढलेली संजू कॉलेजमध्ये बिनधास्त वागते. ट्रेलरमध्ये वर्गात प्रियकराकडे बिनधास्त पाहणारी संजू आपल्याला दिसत आहे. या दृश्यात सैराटपेक्षा अनेक बदल करण्यात आले आहे. आपल्या प्रियकराकडे एकटक पाहताना मध्ये आडव्या येणाऱ्या वर्गमित्राच्या ती कानाखाली वाजवते असे आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
'मनसू मल्लिगे' या चित्रपटात 'सैराट'मधील अनेक प्रसंग जशेच्या तसे घेतलेले असले तरी कन्नड रिमेकमध्ये दाक्षिणात्य टच आपल्याला पाहायला मिळतोय. दूरवर पसरलेले शेत, मुक्त उडणारे पक्षी, धबधबे, सुंदर तळे यांचा खूपच चांगल्या प्रकारे वापर या चित्रपटांमध्ये केलेला दिसत आहे.
सैराट झालं जी या गाण्यामध्ये आर्ची आणि परशा ज्या झाडावर बसले ते सेल्फी पॉईंट बनले होते. काही महिन्यांपूर्वी या झाडाची फांदी तुटल्यामुळे हळहळदेखील व्यक्त करण्यात आली होती. 'मनसू मल्लिगे'मध्येदेखील असेच एक झाड आहे. इतकेच नाही तर तलाव, विहीर, बोट अशी अनेक लोकेशन्स या चित्रपटात 'सैराट'सारखीच आहेत.
'सैराट'मध्ये आर्ची घोड्यावरुन रपेट मारताना दिसली होती. मनसू मल्लिगेमध्येदेखील संजू त्याच तोऱ्यात घोड्यावरुन फिरताना दिसत आहे. कन्नड चित्रपट मनसू मल्लिगेची हवा कर्नाटकासोबतच महाराष्ट्रातही तापत आहे. सैराटची कथा माहिती असल्यामुळे संवादांची अडचण चित्रपट पाहताना जाणवणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात हा चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होईल अशी अटकळ बांधण्यात येत आहे.





Web Title: Sarkat fame Rinku Rajguru played under whose ears?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.