'सैराट' सिनेमानंतर या मराठी सिनेमात झळकणार 'आर्ची'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 17:46 IST2017-10-05T11:55:26+5:302017-10-05T17:46:36+5:30

सैराट या सिनेमात रिंकुने साकारलेल्या भूमिकेने मराठीच नाहीतर सर्व सिनेरसिकांना अक्षरक्षा वेड लावलं. तिचं वागणं, बोलणं, स्क्रीनवरील वावर, डोळ्यांमधील ...

'Sarat' will be seen in the Marathi film 'Archi' | 'सैराट' सिनेमानंतर या मराठी सिनेमात झळकणार 'आर्ची'

'सैराट' सिनेमानंतर या मराठी सिनेमात झळकणार 'आर्ची'

राट या सिनेमात रिंकुने साकारलेल्या भूमिकेने मराठीच नाहीतर सर्व सिनेरसिकांना अक्षरक्षा वेड लावलं. तिचं वागणं, बोलणं, स्क्रीनवरील वावर, डोळ्यांमधील चमक यामुळे तिने साकारलेली आर्ची रसिकांच्या मनामनात भिनली. रसिक जणू काही आर्चीच्या झिंगाट प्रेमात पडले. तिची हीच जादू पाहून तिला मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. सध्याच्या घडीला आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु हे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या ओठावर असलेलं नाव.मराठीच नाही तर इतर भाषांमध्येही तिच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली.त्यामुळे सैराटला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या झिंगाट यशानंतर आर्चीचा आगामी सिनेमा कोणता असेल याची रसिकांना उत्सुकता होती.आर्चीसह झळकलेला परशा म्हणजेच आकाश ठोसर मात्र महेश मांजरेकर यांच्या 'एफयू' सिनेमात झळकला.मात्र रिंकु सैराटनंतर कोणत्याच सिनेमात झळकली नाही. त्यामुळे आता रिंकुच्या चाहत्यांसाठी एक गुड न्युज आहे. कारण,रिंकु राजगुरू लवकरच एका मराठी सिनेमात झळकणार आहे.सध्या सिनेमाचे वाचन सुरू आहे. या सिनेमाची इतर माहिती गुलदस्त्यातच ठेवण्यात आली असून लवकरच सिनेमाची घोषणा करण्यात येणार असल्याचे समजतंय. सैराट सिनेमात आर्ची आणि परशा यांची रोमँटीक लव्हस्टोरी सा-यांनाच भावली.त्यामुळे आता रिंकुच्या आगमी मराठी सिनेमात तिच्यासह कोण झळकणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.

Also Read:जान्हवी कपूरमुळेच नागराज मंजुळेने करण जोहरला मदत करण्यास दिला नकार!

नागराज मंजुळेच्या दिग्दर्शित 'सैराट'ला महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. आता नागराज मंजुळेसुध्दा 'द सायलेन्स' सिनेमात झळकणार आहे.
मराठीमध्ये आलेल्या ‘सैराट’ने केवळ मराठी प्रेक्षकांनाच नव्हे तर देशातील तमाम भाषेतील प्रेक्षकांना वेड लावले. त्यामुळेच निर्माता तथा दिग्दर्शक करण जोहर आता हिंदीमध्ये ‘सैराट’ घेऊन येत असून, यामध्ये आर्चीच्या भूमिकेत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बघावयास मिळणार आहे. मात्र ही बाब मराठी ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना फारशी भावली नसल्याचे दिसून येत आहे. कारण जेव्हा करण जोहर नागराजकडे हिंदी ‘सैराट’च्या निर्मितीसाठी मदत मागण्यास गेला, तेव्हा नागराजने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. नकाराचे कारण जेव्हा विचारण्यात आले तेव्हा जान्हवी कपूर हेच नकाराचे कारण असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.

Web Title: 'Sarat' will be seen in the Marathi film 'Archi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.