सैराटच्या या कलाकाराला मिळाले म्हाडाचे घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 12:43 IST2016-08-10T07:13:28+5:302016-08-10T12:43:28+5:30
सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडले. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटाच्या प्रत्येक कलाकाराला एक वेगळीच लोकप्रियता मिळाली. सगळ्याच ...

सैराटच्या या कलाकाराला मिळाले म्हाडाचे घर
स राट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडले. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटाच्या प्रत्येक कलाकाराला एक वेगळीच लोकप्रियता मिळाली. सगळ्याच कलाकारांना या चित्रपटाचा प्रचंड फायदा झाला. या चित्रपटात अक्काची भूमिका साकारणाऱ्या छाया कदमला नुकतीच म्हाडाची लॉटरी लागली. सायनमधील प्रतिक्षा नगरमध्ये तिला घर मिळाले आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अय्यर म्हणजेच तनुज महाशब्दे, अभिनेत्री सीमा बिस्वास, श्रुती मराठे, मेघना एरंडे यांसारख्या कलाकारांनीही यंदाच्या सोडतीत अर्ज भरला होता.