​संतोष पवार यांचे अंदाज आपला आपला हे नाटक लवकरच रंगभूमीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 12:26 IST2017-10-27T06:55:10+5:302017-10-27T12:26:12+5:30

संतोष पवार यांची अनेक नाटकं आजवर गाजलेली आहेत. संतोषच्या कॉमिक टायमिंगची नेहमीच प्रशंसा केली जाते. संतोष एक चांगला अभिनेता ...

Santosh Pawar's estimate is that this play will soon be played in theater | ​संतोष पवार यांचे अंदाज आपला आपला हे नाटक लवकरच रंगभूमीवर

​संतोष पवार यांचे अंदाज आपला आपला हे नाटक लवकरच रंगभूमीवर

तोष पवार यांची अनेक नाटकं आजवर गाजलेली आहेत. संतोषच्या कॉमिक टायमिंगची नेहमीच प्रशंसा केली जाते. संतोष एक चांगला अभिनेता असण्यासोबतच खूप चांगला दिग्दर्शक आहे. आता संतोष अंदाज आपला आपला ही अंदाज न येणारी घरंदाज कॉमेडी प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे. अंदाज आपला आपला या नाटकाचे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या पोस्टरमध्ये संतोष पवार, अक्षय केळकर, मधुरा देशपांडे आणि माधवी गोगटे ही मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही चारही जणं एका बाईकवर बसली असून ही बाईक संतोष चालवत आहे. कीवी प्रॉडक्शनच्या सहयोगाने वेद प्रॉडक्शन निर्मित हे मनोरंजक नाटक लवकरच मराठी रंगभूमीवर येणार आहे.

Andaj aapla aapla

अंदाज आपला आपला या नाटकाचे दिग्दर्शन संतोष पवार करणार असून हे एक धमाल विनोदी नाटक असणार आहे. या नाटकाद्वारे माधवी गोगटे अनेक दिवसांनंतर रंगभूमीवर परतणार आहेत. तसेच कन्यादान या मालिकेमुळे नावारूपाला आलेली मधुरा देशपांडे या नाटकात आपल्याला एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच अक्षय केळकर या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण करत आहे. या नाटकाच्या तालमी सध्या जोरात सुरू असून हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रत्येकाचे मत हे वेगवेगळे असते. तसेच प्रत्येकाचे विचार हे वेगळे असतात आणि त्याचमुळे या वेगवेगळ्या विचारांमुळे आपापसात वादविवाद आणि समज-गैरसमज होतात. अनेकवेळा या सर्वांतूनच अनेक गमतीजमती आणि मनोरंजक बाबी घडतात. या मनोरंजन बाबी काय आणि कशा घडतात हे रसिकांना अंदाज आपला आपला या नाटकात पाहायला मिळणार आहे. 
अंदाज आपला आपला या नाटकाचे लेखन राजेश कोळंबकर असून नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे आहे. या नाटकाला संगीत साई-पियूष यांनी दिले असून वेशभूषा अंजली खोबरेकर यांची आहे. या नाटकाची निर्मिती विनय गोपाळ अलगेरी, किशोर सावंत आणि विवेक नाईक यांनी मिळून केली आहे. अंदाज आपला आपला हे नाटक प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणार यात काहीच शंका नाही. 

Also Read : ​​'जाणूनबुजून' नाटकाचा होणार सिनेमा ?

Web Title: Santosh Pawar's estimate is that this play will soon be played in theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.