"मराठी अभिनेत्रींना रणबीर, विकीसोबत डेटवर जायचं असतं...", संतोष जुवेकर स्पष्टच बोलला, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 17:54 IST2025-09-27T17:51:21+5:302025-09-27T17:54:11+5:30
संतोषने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी इंडस्ट्री आणि कलाकारांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

"मराठी अभिनेत्रींना रणबीर, विकीसोबत डेटवर जायचं असतं...", संतोष जुवेकर स्पष्टच बोलला, म्हणाला...
संतोष जुवेकर हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता. 'झेंडा', 'मोरया', 'लालबाग परळ' या सिनेमांमुळे संतोषसारखा नवखा आणि उमदा नट सिनेसृष्टीला मिळाला. 'छावा' या हिंदी सिनेमामुळे संतोष प्रसिद्धीझोतात आला. त्याच्या कामाचं कौतुकही झालं. संतोषने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी इंडस्ट्री आणि कलाकारांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
संतोषने नुकतीच इसापनीती या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने मराठी कलाकारच आपल्या कलाकारांचा आदर ठेवत नाहीत असं वक्तव्य केलं. तो म्हणाला, "एका खूप मोठ्या अभिनेत्रीची मी मुलाखत पाहिली. साऊथच्या कलाकाराबद्दल त्या बोलत होत्या. त्यांनी सांगितलं की तो किती गोड माणूस आहे. एवढा मोठा स्टार पण किती साधा आहे. तो माझ्याबरोबर खाली मांडी घालून बसून जेवला. आणि मग त्या म्हणाल्या की आणि आपले मराठी कलाकार जरा काम मिळालं की माज दाखवतात. त्यादिवशी त्या मला भेटल्या. मी त्यांना विचारलं की आपल्याकडचं कोणते कलाकार तुमच्याशी असे वागले? आत्तापर्यंत मी तुमच्यासोबत काम केलं, कधी वाईट वागलो? तुम्ही मोठ्या स्टारचं कौतुक करा. पण, तुम्ही आपल्याच घरातल्या माणसांना मान दिला नाही तर बाहेरचे काय देणार?"
मराठी अभिनेत्रींवरही संतोषने भाष्य केलं. तो पुढे म्हणाला की "आपल्या अनेक अभिनेत्री आहेत. मुलाखतीत जेव्हा त्यांना विचारतात की डेटवर कोणासोबत जायला आवडेल? मग ते म्हणतात की रणबीर कपूर, विकी कौशल...ते तुमच्याकडे बघतील तरी का? तुम्हाला अंकुश चौधरी, सुबोध भावे, प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, उमेश कामत दिसत नाहीत का? ते पण हँडसम आहेत. तुम्ही त्यांच्यासोबत काम करताय आणि ते पण स्टार आहेत. मग तिथे रणबीर कपूर का पाहिजे? त्याला माहीत पण नाही तू कोण आहेस...आणि मग आपण म्हणतो मराठी सिनेमा चालत नाही...कसा चालेल? तुम्हालाच तुमच्या कलाकारांबद्दल आदर नाही. मग लोक आदर कसा देतील?"