संतोष जुवेकर आहे पर्यावरण प्रेमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 14:43 IST2017-02-11T09:13:01+5:302017-02-11T14:43:01+5:30

लोक सोशलमीडियावरून पर्यावरणाचा संदेश देतील. मात्र स्वत:च प्रत्यक्षात पर्यावरणाची काळजी घेणार नाही. पण या परिस्थितीत अभिनेता संतोष जुवेकर हा अपवाद ठरला असल्याचे पाहायला मिळत आहे.

Santosh Juvekar is the environmental lover | संतोष जुवेकर आहे पर्यावरण प्रेमी

संतोष जुवेकर आहे पर्यावरण प्रेमी

च्या गॅझेटच्या युगात प्रत्येक व्यक्ती व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, ट्वििटरच्या दुनियेत व्यग्र झाले आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या युगात ही व्यक्तीला स्वत:कडे पाहण्यासाठी वेळ नसतो. अशा या परिस्थितीत व्यक्ती या पर्यावरणापासून तर पूर्णच दूर झालेली दिसत आहेत. त्यांना पर्यावरणाशी काहीच देणं-घेणं नसतं. एकवेळ हीच लोक सोशलमीडियावरून पर्यावरणाचा संदेश देतील. मात्र स्वत:च प्रत्यक्षात पर्यावरणाची काळजी घेणार नाही. पण या परिस्थितीत अभिनेता संतोष जुवेकर हा अपवाद ठरला असल्याचे पाहायला मिळत आहे. हो, कारण या अभिनेत्याने नुकतेच सोशलमीडियावरून केलेल्या व्हिडीओ आणि पोस्टवरून त्याची पर्यावरण प्रेम समोर आले आहे. त्याने नुकतेच आपल्या घराच्या गॅलरीमध्ये अत्यंत सुंदररीत्या लावलेल्या रोपटयांचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये त्याच्या अत्यंत प्रशस्त अशा गॅलरीमध्ये त्याने कशा पद्धतीने झक्कासपणे रोपटे लावली आहेत हे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर माझे हे होम गार्डन हे माझ्या परिवारातील सदस्यच आहेत असा सुंदर संदेशदेखील त्याने दिला आहे. त्यामुळे त्याने त्याच्या चाहत्यांसमोर एक सुंदर आदर्श ठेवला आहे. त्याच्या या पर्यावरण प्रेमाला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. त्याचप्रमाणे त्याचे कौतुकदेखील होत आहे. संतोषने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता सध्या तो अस्सं सासरं सुरेख बाई या मालिकेच्या माध्यमातून सर्वाचा लाडका यश बनला आहे. या मालिकेतील त्याची प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. त्याचबरोबर त्याने मराठी चित्रपटसृष्टीला झेंडा, शर्यत, मोर्या, मॅटर, तेंडूलकर आउट असे अनेक चित्रपटदेखील दिले आहेत. 

Web Title: Santosh Juvekar is the environmental lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.