पडद्यामागे राहणा-या संजय जाधव यांचा नवा लूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2017 12:07 IST2017-06-03T06:37:23+5:302017-06-03T12:07:23+5:30

संजय जाधव म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव. ज्यांच्या नावापुढचं वलय वेगळंच आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर असलेल्या संजय जाधव ...

Sanjay Jadhav's new look, behind the scenes! | पडद्यामागे राहणा-या संजय जाधव यांचा नवा लूक!

पडद्यामागे राहणा-या संजय जाधव यांचा नवा लूक!

जय जाधव म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव. ज्यांच्या नावापुढचं वलय वेगळंच आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर असलेल्या संजय जाधव यांची बातच काही न्यारी असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यांची स्टाईल, त्यांचं वागणं आणि बोलणं या सगळ्या गोष्टी कायमच चर्चेत असतात. त्यामुळे कलाकारांचे आवडते दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख आहे. कायम पडद्यामागे आणि कॅमे-यामागे राहून चर्चेत राहणा-या संजय जाधव आता वेगळ्या तसंच तितक्याच आगळ्या वेगळ्या रुपात रसिकांच्या समोर येत आहेत. संजय जाधव यांचा हा लूक कुणालाही आश्चर्यचकीत केल्याशिवाय राहणार नाही. नव्या लूकमध्ये संजय जाधव भलतेच स्टायलिश असल्याचे पाहायला मिळतंय. आकर्षक ब्लेझरमध्ये संजय जाधव यांचं व्यक्तीमत्त्व खुलून आलं आहे. या सगळ्यात आणखी एक गोष्ट तुमचं लक्ष आकर्षित करेल. ही लक्षवेधी गोष्ट म्हणजे संजय जाधव यांचे केस. संजय जाधव यांनी नुकतंच हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे. त्यामुळे या हेअर ट्रान्सप्लांटमुळे संजय जाधव यांचा लूक पूर्णपणे बदलला आहे. खुद्द संजय जाधव यांनी आपल्या नव्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेकांसाठी हा लूक सुखद धक्का ठरला आहे. संजय जाधव यांच्या या फोटोला बरेच लाइक्स मिळत असून त्यावर कमेंट्सचाही वर्षाव होत आहे. सोशल मीडियासह फॅन्समध्येही या नव्या लूकबाबत संजय जाधव यांची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळेच एरव्ही पडद्यामागे राहणारे संजय जाधव लवकरच रुपेरी पडद्यावरही झळकले आणि रुपेरी पडद्यावरील कलाकारांना त्यांनी जोरदार टक्कर दिली तर आश्चर्य वाटायला नको !

Web Title: Sanjay Jadhav's new look, behind the scenes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.