संगीतांजली आयोजित रंगणार “अनूपम सृजन” एक संगीत व नृत्याआविष्कार.!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 11:44 IST2018-02-07T06:14:25+5:302018-02-07T11:44:25+5:30

आचार्य पंडित अनुपम राय यांची ‘संगीतांजली’ ही देशातील सर्वात प्रसिद्ध सांस्कृतिक कला संस्था गेल्या ४० वर्षांपासून कार्यरत आहे. वैदिक ...

Sangeetanjali will be organized "Anupam Srishna", a music and dance-drama! | संगीतांजली आयोजित रंगणार “अनूपम सृजन” एक संगीत व नृत्याआविष्कार.!

संगीतांजली आयोजित रंगणार “अनूपम सृजन” एक संगीत व नृत्याआविष्कार.!

ार्य पंडित अनुपम राय यांची ‘संगीतांजली’ ही देशातील सर्वात प्रसिद्ध सांस्कृतिक कला संस्था गेल्या ४० वर्षांपासून कार्यरत आहे. वैदिक युगापासून चालत आलेले संगीत आणि नृत्यांचा प्रचार ते करित आहेत. या संस्थेने महाशिवरात्रीच्या निमित्ताने 'अनूपम सृजन' हा कार्यक्रम १३ फेब्रुवारी २०१८ रोजी संध्याकाळी ६.४५ वाजता रंगशारदा सभागृह, बांद्रा रिक्लेमेशन,मुंबई येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमात नावीन्यपूर्ण संगीत व नृत्य सादर केले जाणार आहेत.

आचार्य पंडित अनुपम राय यांनी शास्त्रीय नृत्य आणि संगीताबद्दल बोलताना सांगितले की, “वेद हे नादांचे संकलन आहे (नाद), ज्याचा आरंभ भगवान शिव यांनी केला आहे, भगवान नटराज यांनी ताल आणि नृत्याचा आरंभ केला आहे तर देवी सरस्वतीने मधुर स्वराचा स्वरसाज चढविला आहे”.'अनूपम सृजन'' हा कार्यक्रम नटवारी कत्थक नृत्य आणि कुटूप (आर्केस्ट्रा) सह शास्त्रीय संगीताचा एक सुंदर संगम आहे आणि या कार्यक्रमात प्राचीन वैदिक संस्कृती ते मुघल काळापासून आजच्या सूफीसंगीता पर्यंत संगीताचा प्रवास उलघडून सांगण्यात येणार आहे व प्रथमच संगीत विश्वात प्राचीन संगीत आणि नृत्य एकत्र पाहायला मिळणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाचा उद्देश युवकांमध्ये भारतीय कला आणि पारंपारिक संस्कृती विषयी लोकांमध्ये आणि विशेषत: तरुण युवापिढीमध्ये शास्त्रीय संगीत आणि नृत्या विषयी स्वारस्य निर्माण करणे हे आहे. 'अनूपम सृजन’ मध्ये ‘जाती गायन’ आणि ‘प्रबंध गायन’ या अध्यायांचा समाविष्ट आहे आणि या भव्य कार्यक्रमाचा उल्लेखनीय क्षण एक असेल ज्यात नृत्याच्या माध्यमातून भूस्यावर चित्र रेखाटले जाणार आहे. २०१८ मध्ये देशभरात सर्वत्र या कार्याक्रम सादर करण्यात येणार आहेत तसेच हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे.

आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपारिक संगीत आणि नृत्य यांचे मिश्रण हेच 'अनूपम सृजन '' या कार्याक्रमाचे विशेष वैशिष्ट्य आहे. कार्यक्रमाचा पहिला भाग भगवान शिव यांना समर्पित असेल व दुसऱ्या भागात मुघल संस्कृती सादर केली जाईल. कार्यक्रमात ३ मुख्य कलाकार कत्थक नृत्य सादर करणार आहेत,  अनुरत्न राय यांनी वयाच्या ९ व्या वर्षी ऐतिहासिक जागतिक विक्रम केला होता आणि याची नोंद “लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्स” मध्ये केली गेली आहे, श्रिया पोपट या प्रख्यात कत्थक नृत्यकार आहेत व अनुरिता राय यांनी १०००० चक्रा असा कत्थक नृत्याचा जागतिक विक्रम केला होता. प्रख्यात नृत्यकार गुरु माँ विदुशी रीटा राय देखील उपस्थित असणार आहेत.
 
कार्यक्रमाचा पहिला भाग प्राचीन सनातन काळावर आधारित असेल व यात शिव पंचाक्षर स्तोत्र,रावण क्रित शिव तांडव आणि शिव भगवान यांना समर्पित प्रबंध रचना यावर नटवरी कथक नृत्य सादर केले जाईल. कार्यक्रमा बद्दल सांगताना अनुरिता राय म्हणाल्या की, “आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रथमच प्राचीन आणि पारंपारिक पद्धतीचे संगीत व नृत्य एकाच मंचावर सादर करणार आहोत, नंतर रागबहार, शिव भजन, व लोकसंगीतातून शिव विवाह मांडला जाणार आहे.”कार्यक्रमाच्या दुसर्या भागात, मुघल काळात सादर केले जाणारे तराना- गायीकीवर आधारित नृत्य शैली पाहायला मिळणार आहे. तरणा गायकीचे (भाषांतर) कत्थक नृत्यात सादरीकरण केले जाणार आहे व त्यानंतर गझल देखील सादर केली जाईल. कार्यक्रमाची सांगता सुफियाना क़लाम नंतर होईल. अनुपम सृनच्या सादरी कारणासाठी तबला,पखवाज, बासरी, गिटार आणि ढोलक यांच्यातील सुप्रसिद्ध मंडळी नृत्य आणि गायनाला साथ देण्यासाठी उपस्थित असतील.


Web Title: Sangeetanjali will be organized "Anupam Srishna", a music and dance-drama!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.